महाराष्ट्र

बसेस (ST) फिरविण्यासाठी जागा नाही म्हणून निलंगा तालुक्यातील निटूर गावात आवक-जावक ठप्प

महाराष्ट्र खाकी ( निलंगा / प्रशांत साळुंके ) – निलंगा तालुक्यातील निटूर गावाची लोकसंख्या पंधरा हजाराच्या घरात असताना अनेक बसेस ह्या निटूर मोडहुन सुसाट वेगाने मार्गस्थ होत आहेत.निटूर गाव जहिराबाद-लातूर राष्ट्रीय महामार्गावरील दुसर्‍यां क्रमांकाची बाजारपेठ असताना देखिल बसेस गावात येत नसल्याने प्रवास करणारे प्रवाशीधारक महाराष्ट्र राज्य परिवहन

महामंडळावर नाराज आहेत. सध्या लग्नसराईचे दिवस असल्याने निटूर व परिसरातील पंधरा खेडयाचे नागरिक व महिला प्रवास करत असताना दिसत आहेत माञ बसेस गावात येत नसल्याने प्रवाशांची तारांबळ उडाली आहे याकडे संबंधित वरिष्ठांचे लक्ष नसल्याने हा प्रकार घडत आहे प्रवाशांच्या सुखासाठी या ब्रिदवाक्यानुसार बसेस सेवा देतात माञ हायवेच्या गावाला काही नसताना

विनाकारण ञास प्रवाशांना भोगण्याची वेळ सद्यस्थितीला आहे. निटूर याठिकाणी परिसरातील शालेय,महाविद्यालय शिक्षणासाठी विद्यार्थ्यांची आवक-जावक मोठ्याप्रमाणात आहे.तसेच, बॅंकेचा व्यवहारासाठी,तलाठी सज्जा,अन्य कामकाजासाठी आवक-जावक याठिकाणी मोठ्याप्रमाणात आहे. माञ,निटूरमोडहुन विद्यार्थ्यांना गावात येण्यासाठी दहा रूपये मोजावे लागत आहे हा

आर्थिक बोजा त्यांच्यावर पडत असल्याने निटूर गावात बसेस आणून फिरवून ही सेवा पूर्ववत करावी,अशी मागणी जोर धरित आहे. अगोदरच्या अनेक बसेस बंद केल्याने प्रवाशांचे हाल होताना दिसत आहेत तात्काळ त्या ही बसेस चालू करण्याची मागणी जोर धरित आहेत. एकंदर, निटूरमोडहुन जाणार्‍या अनेक बसेस ह्या गावातूनचं फिरवून मार्गस्थ करण्यात याव्यात अशी मागणी जोर धरित आहे.

Most Popular

To Top