भारत

पूर्णब्रह्मायोगिनी त्यागमूर्ती श्रीमती प्रयागअक्का कराड समर्पित जीवनगौरव पुरस्काराने पंचकन्यांचा सन्मान आणि गौरव

महाराष्ट्र खाकी ( रुई रामेश्वर ) – लातूर जिल्ह्यातील रुई रामेश्वर या गावातील कराड परिवाराने देशात आणि विदेशात शैक्षणीक आणि धार्मिक क्षेत्रात आपला वेगळा ठसा निर्माण केला आहे. विश्वशांती केंद्र (आळंदी),माईर्स MIT , पुणे या संस्थेचे संस्थापक डॉ. विश्वनाथ कराड यांच्या आणि कराड परिवाराची जडणघडण आणि संस्कार पूर्णब्रह्मयोगिनी त्यागमूर्ती श्रीमती प्रयागअक्का कराड

यांनी केले आहे . रामेश्वर (रुई) येथे पूर्णब्रह्मयोगिनी त्यागमूर्ती श्रीमती प्रयागअक्का कराड यांच्या नवव्या पुण्यस्मरण स्मृतिदिनाचे औचित्य साधून, शैक्षणिक, सामाजिक आणि अध्यात्माचा समन्वयातून आयुष्यभर समाजप्रबोधन व सांप्रदायिक सद्भावनेचे सेवाभावी कार्य, समर्पित व निरपेक्ष भावनेने अव्याहतपणे करून, समाजासमोर  आदर्श निर्माण करणार्या पंचकन्यामध्ये, संत

साहित्याच्या गाढ्या अभ्यासक व पुणे येथील पुण्यधाम आश्रमाच्या अध्यक्षा माता कृष्णा कश्यप, ज्येष्ठ समाजसेविका व थोर तपस्विनी शशिकला भिकाजी केंद्रे,  सुप्रसिद्ध स्त्री रोग तज्ञ व ज्येष्ठ समाजसेविका डॉ. तेजस्विनी जनार्दन वाडेकर,  निवृत्त प्राचार्यां व आपुलकी या संस्थेच्या संस्थापक संचालिका डॉ. ललिता शरद (नानासाहेब) गुप्ते आणि ज्येष्ठ समाजसेविका लक्ष्मीबाई

महादु शेळके यांना पूर्णब्रह्मायोगिनी त्यागमूर्ती श्रीमती प्रयागअक्का कराड समर्पित जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सन्मानपत्र, स्मृतिचिन्ह, सुवर्णपदक व रोख रु. 21,000/- (रुपये एकवीस हजार) प्रदान करण्यात आले. त्या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून चाकूरकर बोलत होते.एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड हे

अध्यक्षस्थानी होते. या वेळी ह.भ.प. तुळशीराम दा. कराड, प्रगतीशील शेतकरी काशीराम दा. कराड, माईर्स MIT शिक्षण संस्था समूहाचे कार्याध्यक्ष राहुल विश्वनाथ कराड, MIT ATD विद्यापीठीचे कार्याध्यक्ष प्रा.डॉ. मंगेश तु. कराड, MIMSR वैद्यकीय महाविद्यालयाचे कार्यकारी संचालक आमदार रमेशअप्पा कराड, संस्कृतचे गाढे अभ्यासक पं. वसंतराव गाडगीळ, कमल राजेखाँ पटेल,डॉ. हनुमंत कराड, , ह.भ.प. नारायण महाराज उत्तरेश्वर पिंप्रीकर व राजेश कराड हे उपस्थित होते.

शिवराज पाटील-चाकूरकर – “देशात ज्या प्रकारे चांगल्या गोष्टी आहेत तसेच वाईट पण आहेत. सध्या हा देश जाती आणि धर्माच्या बंधनात अधिक अडकलेला दिसतो. मानवाला सुखी जीवन जगायचे असेल तर देशात चांगली परिस्थिती निर्माण होणे गरजेचे आहे.

माझ्या 48 वर्षाच्या राजकारणाच्या प्रवासात जगातील सर्व धार्मिक स्थळांना भेट दिली. त्यामध्ये रामेश्वर येथील राम मंदिरातील मूर्त्यां या सर्वात सौदर्यवान आहेत. सौदर्य काय असते हे मूर्त्यांच्या डोळ्यात पाहिल्यावर कळते. सौदर्य हा सत्याचा भाग आहे. जेथे सत्य प्रकट होते तेथेच मनामध्ये पवित्र भावना निर्माण होते. ही भावना धार्मिक स्थळांवर गेल्यावर कळते. डॉ. विश्वनाथ कराड यांनी त्यांच्या गावी

हिंदू मुस्लिमांचा नाही तर वैचारिक पूल निर्माण करून एकतेचे मोठे कार्य केले आहे. कोणी ही असो त्याला धर्माची भावना मोठी असते परंतू चांगुलपणा एकट्यामुळे नाही तर घरातील सर्व सदस्यांमुळे येत असतो.”आज पंच कन्यांचा नाही तर पंच मातांचा सत्कार होतांना आनंद होत आहे. ज्ञान हे सर्वात महत्वाचे असून ते सत्यम शिवम सुंदर असते. या मातांनी आपल्या कार्यातून हे ज्ञान दाखवून दिले आहे. तसेच संपूर्ण जगात एकोपाचा संदेश देण्यासाठी रामेश्वर हे गावाचा आदर्श जगात पोहचविणे गरजेचे आहे.”असे मत लोकसभेचे माजी सभापती व माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांनी मांडले.

प्रा.डॉ.विश्वनाथ दा. कराड – “अक्कांची आठवण ही हदय स्पर्शी आहे. त्या शक्तीच्या स्त्रोत आहेत. भारतीय संस्कृती, परंपरा आणि तत्वज्ञानाचे मुर्तीमंत प्रतिक त्यागमूर्ती अक्का आहेत. ईश्वर ही व्यक्ती नाही तर शक्ती आहे. आज संपूर्ण जगात आळंदीतून विश्व शांतीचा संदेश पोहचत असतांना रामेश्वर हे गाव मागे नाही. येथे मानव एकतेचा मोठे प्रतिक निर्माण केले गेले आहे. हे गाव ज्ञान यज्ञ भूमी होते याचे काही पुरावे सापडले आहेत. आता अक्कांच्या नावाने दिला जाणारा पंच कन्या पुरस्कार आता सप्त कन्याने होणार आहे.”

राहुल विश्वनाथ कराड – “डॉ. विश्वनाथ कराड यांच्या संकल्पनेतून त्यागमूर्ती प्रयागअक्का कराड यांच्या स्मृति प्रित्यार्थ या कार्यक्रमाचे आयोजन होतांना अतिशय समाधानाचे भाव अनुभवतो. त्यांच्याकडे पाहुनच देशातील राजकारणातील गढुळपणा काढून स्वच्छता कशी आणावी या साठी कार्य सुरू आहे.”

डॉ. मंगेश तु. कराड – “शिक्षणाच्या माध्यमातून जगभर झेंडा फडकविणारे डॉ. विश्वनाथ कराड यांनी अक्कांच्या प्रेरणेतूनच हे सर्व कार्य केले आहे. आमच्या एकत्रित कुटुंबात अक्का ही मायाचा झरा होती. अन्नपूर्णा अक्कांनी जो त्याग केला आहे.त्यामुळेच त्यांना त्यागमूर्ती असे संबोधितले जाते.”

आमदार रमेशअप्पा कराड – “कोविडच्या काळामुळे दोन वर्ष हा पुरस्कार देता आला नाही. याची खंत वाटते. बहिण भावाचे नाते काय असते हे अक्का आणि अण्णाभाऊंकडे पाहून कळते. अक्कांच्या आर्शीवादाने डॉ. विश्वनाथ कराड यांनी शिक्षण संस्था उभी केली. तसेच भारतीय संस्कृती, अध्यात्मिक व सामाजिक कार्य अविरत सुरू आहे. एकत्रित कराड परिवाराचा आदर्श संपूर्ण महाराष्ट्राने घ्यावा असे कार्य अक्कांनी केले आहे.”

सर्व पुरस्कार्थीयांनी आपले मनोगत व्यक्त केले.
एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी चे प्र कुल

Most Popular

To Top