महाराष्ट्र खाकी ( लातूर / प्रशांत साळुंके ) – छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेल्या स्वराज्याचे अत्यंत निष्ठेने, निर्भीडपणे, संवर्धन आणि रक्षण करण्याचे महान कार्य छत्रपती संभाजी राजेंनी केले,मोघल, आदिलशहा, पोर्तुगीज,सिद्धी यांना त्यांनी स्वतःच्या बुद्धीने आणि पराक्रमाने सळो की पळो करून सोडले होते,छत्रपती संभाजी राजेंचे रयतेवर जिवापाड प्रेम होते,छत्रपती
संभाजी राजेंनी रयतेच्या सुखासाठी आयुष्य पणाला लावले.छत्रपती संभाजी महाराज बुद्धिमान, विज्ञानवादी, धर्मपंडित, कर्तृत्ववान व चरित्र संपन्न राजे होते.नवतरुनांनी त्यांचे सर्वगुण अंगिकारले पाहिजे असे मत प्रा. संभाजी नवघरे यांनी व्यक्त केले, ते जिजाऊ सृष्टी येथे मराठा सेवा संघाच्या वतीने आयोजित व्याख्यानमालेत बोलत होते, यावेळी विचारपीठावर तहसीलदार गणेश जाधव,अनंतराव
गायकवाड,मराठा सेवा संघाचे जिल्हा सचिव जाधव एम एम, डी. बी. बरमदे, विनोद सोनवणे, मिथुन दिवे उपस्थित होते. यावेळी उपस्थित बांधवांना स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी या 100 ग्रंथाचे वाटप करण्यात आले. प्रस्ताविक डॉ. उद्धव जाधव सूत्रसंचालन उत्तम शेळके तर आभार अनिल जाधव यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी इंजि मोहन घोरपडे, आर के नेलवाडे, दत्तात्रय बाबळसुरे, कुमोद
लोभे,आनंद जाधव, डी. एन. बरमदे, अजित लोभे, प्रमोद कदम, अंकुश धानुरे,प्रकाश सगरे, अर्चना जाधव,राजू बरमदे,डॉ. नितीश लंबे आदींनी परिश्रम घेतले.