हरंगुळ जलशुद्धिकेंद्रात पोहचलेल्या पाण्यावर क्लोरीन डाय ऑक्साईड केमिकालचा वापर करून रंग काढण्याचे प्रयत्न सुरु

महाराष्ट्र खाकी (लातूर) – लातूर शहरला होणाऱ्या पिवळ्या पाणी पुरवठ्यामुळे राजकीय, सामाजिक आणि लोकांचे जीवन ढवळून निघत आहे. मागील काही दिवसापासून लातूरकरांना शुद्ध आणि रंग विरहित पाणी पुरवठा कसा करता येईल यासाठी महापौर आणि मनपा प्रशासन प्रयत्न करत आहे. याचाच एक भाग म्हणून लातूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धनेगाव येथील मांजरा धरणाच्या

पंप हाऊसची काल महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी पाहणी केली. मागील दोन – तिन दिवसांपासून वरील गेट उघडण्याचा प्रयत्न सुरू होते परंतु मागील 15 वर्षापासून गेट कार्यान्वित केले गेले नसल्याने गेट उघटण्यात यश आले नाही. साताऱ्यावरून मागवलेले क्लोरीन डाय ऑक्साईड केमिकालचा साठा उपलब्ध झाला आहे. मांजरा धरणातून मनपाच्या हरंगुळ येथील

जालशुद्धीकारण केंद्रात पाणी पोहचले आहे. उपलब्ध
झालेल्या क्लोरीन डाय ऑक्साईड केमिकालचा वापरकरून पाण्याचा पिवळा रंग काढण्याचा प्रयत्न करणार आणि जर पाण्याचा रंग गेला तर उद्या पासून शहरात पाणी पुरवठा सुरळीत होईल. महापालिकेच्या वतीने स्वच्छ पाणी देण्यासाठी आम्ही सर्वोतोपरी प्रयत्न करत आहे . जोपर्यंत स्वच्छ पाण्याची खात्री होत नाही,

तोपर्यंत पाणी पुरवठा करण्यात येणार नाही. पिण्यायोग्य पाणी आढळल्यास पाणीपुरवठा करण्यात येईल.असे महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी सांगितले आहे.

Recent Posts