महाराष्ट्र

शिक्षणाचे माहेरघर म्हणून प्रसिध्द असलेले पुणे येथील रायडर सार्थक चव्हाणची सार्थ कामगिरी

महाराष्ट्र खाकी ( निलंगा / प्रशांत साळुंके )– होंडा रेशिंग स्पर्धेमध्ये भारताचा विशेषत: पुण्याचा रायडर सार्थक चव्हाणने टॅलेंट कप-2022 च्या दुसर्‍या फेरीमध्ये तिसर्‍या क्रमांकांसह विजय मिळविला आहे. होंडा रेशिंग इंडियाच्या रेशिंग इतिहासात भारतीय रायडरने ही उल्लेखनीय कामगिरी करण्याची ही पहिलीच वेळ आहे पुण्यातील ( वय-15 ) सार्थकने 12 व्या स्थानावर सुरूवात

केल्यानंतर राऊंड 2 च्या शर्यतीत आपला मार्ग काळजीपूर्वक चालवला रेस लीडरपेक्षा फक्त 0.583 सेकंद मागे राहून शर्यत तिसर्‍या क्रमांकावर पूर्ण केली.सार्थकचा सहकारी केविन क्विंटल ( वय-13 )यानेही शर्यतीत आत्मविश्वासपूर्ण तरूण भारतीय रायडरची ताकद वाढवली.केविनने कठोर स्पार्धेमध्ये चिकाटी ठेवली आणि एकूण 29:50.642 वेळेसह 9 व्या स्थानावर थांबला.दोन

रायडर्सच्या एकञित प्रयत्नामुळे संघाला 32 गुण मिळाले यासह सार्थकने 6 गुण आणि केविनने 4 गुणांची भर घातली थायलंड टॅलेंट चषक-2022 च्या दुसर्‍या फेरीच्या समाप्तीसह,सार्थक चव्हाणचे आता एकूण 35 गुण आहेत तर त्याचा सहकारी केविन क्विंटलचे 10 गुण आहेत. प्रस्तुत प्रतिनिधींशी सार्थक चव्हाण यांनी संवाद साधताना म्हणाला,या फेरीतील माझ्या कामगिरीने खूप खूश आहे

कारण मी ट्रॅकवर माझी जास्तीत जास्त कामगिरी करू शकलो शेवटच्या फेरीतून शिकून आणि माझ्या मार्गदर्शकांसोबत प्रशिक्षण घेउन मी स्पर्धेत तिसरे स्थान मिळवले या विजयामुळे माझा आत्मविश्वास वाठला असून यापुठेही कठोर संघर्ष करत राहीन असेही तो म्हटला. सार्थक चव्हाणने सार्थ कामगिरी केल्याबद्दल त्याचे सोमवंशी आर्य क्षञिय समाजाकडून त्याचे कौतुक आणि

अभानंदनाचा वर्षाव होताना दिसत आहे.अनेकांनी आपल्या समाजाचे भूषण आहे सार्थक पुठील रायडरसाठी शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.

Most Popular

To Top