महाराष्ट्र खाकी ( कल्याण ) – देशात मानवाधिकार न्याय जनसेवा ट्रस्ट नवी दिल्ली वतीने 2022 चा ‘मानवाधिकार रत्न पुरस्कार’ लातूरचे लोकप्रिय संसद रत्न माजी खासदार प्रोफेसर डॉ. सुनील बळीराम गायकवाड यांना देण्यात आला. या आधीपण डॉ.सुनील गायकवाड यांना त्यांच्या कार्यामुळे अनेक पुरस्काराने सन्मानित केले आहे. डॉ. सुनील गायकवाड यांनी खासदार असताना लातूर
लोकसभा आणि संसदेत आपल्या कार्यातून एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. आता त्यानां मानवाधिकार न्याय जनसेवा ट्रस्ट नवी दिल्ली वतीने 2022 चा ‘मानवाधिकार रत्न पुरस्कार’ मिळाला आहे. मानवाधिकार ट्रस्टच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकी नंतर पुरस्कार सोहळा संपन्न झाला. संस्थेचे अध्यक्ष दिनेश गुप्ता यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला. लोकसभेचे खासदार
असताना आणि दैनिक लोकशासन दैनिक सुपुत्र च्या माध्यमातून जनतेला आपला अधिकार मिळवून देण्यासाठी करण्यात आलेल्या अनेक कामाची दखल घेऊन, अनेक गरीब माणसांना त्यांचा अधिकार मिळवून देण्यासाठी केलेला प्रयत्न, यासाठी मानवाधिकार संस्थेने ‘मानवाधिकार रत्न पुरस्कार’ देऊन डॉक्टर सुनील बळीराम गायकवाड यांचा गौरव केला. प्रशस्तीपत्र आणि स्मृती
चिन्ह देऊन हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला मानवाधिकार न्याय ट्रस्ट चे देशभरातील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.बिहार,झारखंड, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र ,गुजरात, गोवा, मध्य प्रदेश,या ठिकाणाहून महिला आणि पुरुष यांची संख्या लक्षणीय होती. मानवाधिकार न्याय ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष दिनेश गुप्ता यांचा आज वाढदिवस पण सर्वांसोबत साजरा करण्यात आला.