निलंगा तालुक्यातील मोठी बाजारपेठ असलेल्या निटूर मध्ये सतत विजपूरवठा खंडीत होत असल्याने ऐन उन्हाळ्यात नागरिक आणि व्यापाऱ्यांचे हाल

महाराष्ट्र खाकी ( निलंगा / प्रशांत साळुंके ) – लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील निटूर गावाची संख्या सोळा हजाराच्या घरात असताना सततचा होणारा विजपूरवठा खंडीत होत आहे.तरी,महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ, 33/11 के.व्ही.उपकेंद्र, निटूर मोड याठिकाणी कार्यालय आहे.माञ,गेल्या अनेक दिवसांपासून सततचा होणारा विजपूरवठा खंडीत होताना दिसत आहे. निलंगा

तालुक्यातील निटूर गाव तसे व्यापारीकरणाच्या दुसर्‍या क्रमांकाचे गाव म्हणून परिचित आहे. तसेच, शैक्षणिक, प्रशासकीय कार्यालय, बॅंकेच्या व्यवहारासाठी याठिकाणी परगावातील नागरिक यांची मोठ्यासंख्येने आवक-जावक असते.भर ऊन्हाळ्यात ही अवस्था नागरिकांना ञास होताना दिसत आहे.यंदा उन्हाचा पारा जास्त असल्याने अनेक नागरिक यांची सततचा विजपूरवठा होत असल्याने

त्यांची गैरसोय होताना दिसत आहे. विज ग्राहकांनी आपल्या संरक्षणासाठी पंखे, कूल्लर वापर करण्यासाठी त्यांनी खरेदी केली माञ सततचा होणारा विजपूरवठा खंडीत होत असल्याने विजग्राहक नाराज आहेत.तसेच, अनेक विद्यार्थी याठिकाणी शैक्षणिक सञ चालू असल्याने त्यांनाही ञास होताना दिसत आहे. प्रशासकीय कार्यालयात नागरिकांना अनेक आॅनलाईन

कागद-पञे काढण्यासाठी ञास सहन करावा लागत आहे.बॅंकेच्या व्यवहारासाठी तेरा ते चौदा गावातील खातेग्राहक याठिकाणी येतात त्यांनाही सततचा होणारा विजपूरवठा खंडीत होत असल्याने ञास सहन करावा लागत आहे. एकंदर,सततचा होणारा विजपूरवठा खंडीत संबंधितांनी सुरूळीत करून अनेक प्रश्नांना नागरिकांना सामोरे जावे लागत आहे तरी सुरूळीत विजपूरवठा करावा,अशी मागणी व्यापारी व ग्रामस्थ करित आहेत.

Recent Posts