महाराष्ट्र खाकी (लातूर) – लातूर जिल्ह्यातील औसा मतदारसंघाचे आमदार अभिमन्यू पवार हे एकमेव असे आमदार आहेत जे मतदारसंघाच्या विकासासाठी आणि लोकसेवेसाठी केंद्रीय मंत्री, राज्यातील मंत्री वेगवेगळ्या विभागाच्या अधिकाऱ्यांना भेटी घेत असतात. मतदारसंघातील विवीध विकास कामानिमित्त औश्याचे भाग्यविधाते ठरलेले आमदार अभिमन्यू पवार यांनी दि
19. मंगळवार रोजी लातूर येथे जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी पी यांची भेट घेऊन मतदारसंघातील विविध विकासकामांबाबत चर्चा केली व निवेदन दिले. किल्लारी येथे मंजूर करून आणलेल्या मराठवाड्यातील पहिल्या स्वतंत्र आयुष रुग्णालयासाठी किल्लारी ग्रामीण रुग्णालयाकडे असलेली जमीन तातडीने हस्तांतरित करावी, श्री निळकंठेश्वर देवस्थान किल्लारी येथे
भक्तांसाठी सोयीसुविधा विकसित करण्यासाठी वन विभागाला दिलेली जमीन वगळून गावठाणात उपलब्ध असलेली जमीन देवस्थानाकडे वर्ग करावी तसेच खरोसा येथील ऐतिहासिक बौद्ध लेणी, देवी मंदिर व परिसराच्या विकासासाठी शासनाकडे प्रस्ताव सादर करावा. औसा येथील जागेअभावी रखडलेले क्रीडा संकुल औसानजीक असलेल्या उंबडगा खु. येथे मंजूर करावे, औसा येथे नवीन
शासकीय धान्य गोदामाचे बांधकाम करण्यात यावे, औसा शहरातील बागवान समाजाच्या दफनभूमीसाठी जमीन संपादित करावी, नायब तहसीलदारांसह औसा मतदारसंघातील रिक्त असलेली सर्व पदे तात्काळ भरण्यात यावीत तसेच औसा शहरातील विस्तारित वस्त्यांमध्ये दुर्व्यवस्था झालेल्या अंतर्गत रस्त्यांचे खडीकरण व मजबुतीकरण काम रोहयोअंतर्गत करण्यात यावे. शासन
आदेशाप्रमाणे मतदारसंघातील बंद असलेली सेतू कार्यालये तातडीने सुरु करण्यात यावीत, मतदारसंघातील सर्व गावांमधील पाणीपुरवठा योजनांसाठी स्वतंत्र रोहित्र बसविण्यासाठी जनसुविधाअंतर्गत निधी उपलब्ध करून द्यावा, मोजणीअभावी रखडलेल्या शेतरस्त्यांच्या कामांना गती देण्यासाठी मोजणीचे काम आऊटसोर्स करावे तसेच 2011 पूर्वीची गावठाण/गायरान जमिनींवरील घरे
नियमित करण्याच्या पंचायत समितीने सादर केलेल्या प्रस्तावास मंजुरी प्रदान करावी. मोठा पाठपुरावा करून रोहयो राज्य अभिसरण आराखड्यात सर्व 262 कामे समाविष्ट करून घेतली आहेत पण त्याची अंमलबजावणी होत नसल्याचे जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी पी यांच्या निदर्शनास आणून देत किमान औसा मतदारसंघात तरी अभिसरणातून कामे करून एक मॉडेल विकसित करावे
अशी विनंती आणि मागण्या या भेटीवेळी आमदार अभिमन्यू पवार यांनी जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी पी यांच्या कडे केली.