महाराष्ट्र खाकी ( परळी ) – डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त भिम महोत्सवाचे परळीत उद्घाटन बीड जिल्हा परिषदेचे गटनेते अजय मुंडे यांच्या हस्ते संपन्न झाले. राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडेंच्या संकल्पनेतून साकारलेला भीम महोत्सव हा महाराष्ट्र राज्यात आदर्श असा उपक्रम आहे, असे यावेळी जिल्हा परिषदेचे गटनेते अजय मुंडे म्हणाले.
भीम महोत्सवानिमित्ताने परळीकरांना वेगवेगळ्या गीतकारांची ३ दिवसीय भीम गीतांची मेजवानी आहे, परळी शहरातील मोंढा मैदान येथे हा महोत्सव साजरा होत आहे. करोना काळानंतर पुन्हा भीम महोत्सव घेता येत आहे, याचा आनंद आहे, या भीम महोत्सवास परळीकरांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे अवाहन देखील यावेळी अजय मुंडे यांनी केले.
या महोत्सवासाठी विशेष परिश्रम घेणारे परळी शहर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी, शहर राष्ट्रवादीचे सरचिटणीस अनंत इंगळे, सचिव प्रा विनोद जगतकर व आयोजक सदस्यांचे विशेष कौतुक यावेळी जिल्हा परिषदेचे गटनेते अजय मुंडे यांनी केले व उपस्थित भीम बांधवांना जयंतीनिमित्त शुभेच्छा दिल्या.
उदय साटम निर्मित आंतरराष्ट्रीय दर्जाचा “वंदन भीमराया” या 75 कलाकारांचा संच असलेल्या बहारदार कार्यक्रमाने भीम महोत्सव 2022 ची सुरुवात झाली. तथागत भगवान बुद्ध, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज विविध गीतांमध्ये मंचावर अवतरतात हा प्रसंग अंगावर रोमांच उभा करणारा ठरला. प्रेक्षकांचा उत्साह, जल्लोषपूर्ण प्रतिसाद, जोषपूर्ण निवेदन, कलाकारांचा अप्रतिम अभिनय, उत्कृष्ठ गायन, संगीत यांच्या सुरेख मिलाप झाल्याने कार्यक्रम अविस्मरणीय ठरला.
वंदन भिमराया या कार्यक्रमात तथागत भगवान बुद्ध,डॉ.बाबासाहेब आंबेडकर,छत्रपती शिवाजी महाराज,माता रमाई यांच्यावर आधारित विविध भीम गीते सादर झाली.तसेच वामनदादा कर्डक,प्रल्हाद शिंदे,आनंद शिंदे यांनी अजरामर केलेली अनेक गीते सादर केली गेली.
‘प्रथम नमन तुज गौतमा’, भिमजयंती आली’ बाबासाहेबांची सही आहे र’, ‘कुंकू लावील रमान’, ‘आहे कोणाचे योगदान’,’ दोनच राजे येथे जन्मले कोकण पुण्यभूमी वर’, बोला जय भीम”,’उसळत्या रक्ताचा पाडीला प्रभाव”, मैं भीमराज की बेटी हू’ यासह अनेक गीते व समूह गीते या कार्यक्रमात सादर करण्यात आली.
एक दशकापासून अविरत सुरु असलेल्या “भीम महोत्सव” आता वेगळ्या उंचीवर गेला आहे. कोविड टाळेबंदी नंतर सर्वजण भीम महोत्सवाचा मनमुराद आनंद घेताना दिसून आले.
या कार्यक्रमास परळी तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष लक्ष्मण तात्या पौळ,वैजनाथ सोळंके, सुरेश टाक, रवी परदेशी,अय्यूब पठाण, प्रा.दासु वाघमारे, नगरसेवक गोपाळ आंधळे,संजय फड,रमेश चौंडे,विजय गंडले,सोपान ताटे,वैजनाथ बागवले,दत्ताभाऊ सावंत, संजय फड,विश्वनाथ गायकवाड,अनिल मस्के,ॲड दिलीपराव उजगरे,
रमेश मस्के,अर्चनाताई रोडे, सुलभाताई साळवे, सुरेश टाक, रमेश भोईटे, महेंद्र रोडे, रवि मुळे, जयपाल लाहोटी, राहुल जगतकर, अमर रोडे, शंकर कापसे, जालिन्दर नाईकवाडे, सुभाष वाघमारे, प्रा. विलास रोडे,प्रा. श्याम दासुद,पंडीत झिंजुर्डे, अन्नापुर्णा जाधव, प्रकाश तुसाम, आशोक कांबळे, सुभाष कांबळे, रतन आदोडे, रंगनाथ सावजी, जितेंद्र नव्हाडे, विजय हजारे, श्रावण
आदोडे,आशोक पोटभरे, जयदत नरवटे,
विनोद आचार्य, महेंद्र शिंदे, के डी उपाडे, डी जी मस्के, बालाजी वाघ,बळीराम नागरगोजे,वसंतराव उधार, बालाजी मस्के,संतोष घोडके, बापु गायकवाड, शिवाजी होके, सखाराम आदोडे, ज्ञानेश्वर होळंबे, मोहन साखरे, विश्वजीत कांबळे,राज हजारे,भारत ताटे,मुन्ना मस्के, संजय शिंदे, राहुल घोबाळे, आनंद तुपसमुद्रे, प्रदिप भोकरे,
भिमराव मुजमुले,बबलु साळवे,आदी पदाधिकारी, कार्यकर्ते व भीमअनुयायी बांधव परळीकर मोठ्या संख्येने उपस्थित होते.