महाराष्ट्र

लातूरचे खासदार सुधाकर शृंगारे यांचा कोरोनाकाळातील योगदानाबद्दल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते सन्मान

महाराष्ट्र खाकी ( मुबंई ) – कोरोना काळात सर्व जग थांबले होते. लोकांना या महामारीत अनेक नेते, सामाजिक संस्था यांनी लोकांना मदत केली होती. अशीच मदत लातूर लोकसभा मतदारसंघातील जनतेची सेवा केली होती. लातूरच्या जनतेसाठी खरी मदत तर संभाजी पाटील निलंगेकर यांनी आणि त्यांच्या टिमने केली होती. तस पहिले तर खासदार सुधाकर शृंगारे कोरोना काळात

लातूरकडे फिराकले ही नाहीत. सर्वत्र चर्चा होऊ लागल्यानंतर निलंगेकराच्या सांगण्यावरून खासदार लातूर मध्ये दिसले आणि मदत कार्य केले!. आणि आता खासदारांचा सन्मान होतो खरेतर संभाजी पाटील निलंगेकरांचा सन्मान होयला पाहिजे होता अशी चर्चा लातूर भाजपात आणि जिल्ह्यात होत आहे.

कोरोनाकाळात लातूर लोकसभा मतदारसंघासाठी दिलेल्या या योगदानाबद्दल महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते “पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार” देऊन खासदार सुधाकर शृंगारे यांचा सन्मान करण्यात आला. सागा फिल्म्स फाउंडेशन या संस्थेच्या वतीने या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. लातूर जिल्ह्यात कोविडने लोक त्रस्त असताना 50 हजारपेक्षा जास्त गरजू कुटुंबांना

अन्नधान्य किट घरपोच दिले, रेमिडिसिव्हिर इंजेक्शन मोठया संख्येने उपलब्ध करून दिले, ऑक्सिजन प्लांट लातूरमध्ये प्रयत्न करून उभारला. कोविडकाळातील अशा अनेक कामांबद्दल आज सन्मान करण्यात आला. या वेळी मंचावर श्रीमंत छत्रपती राजमाता कल्पनाराजे भोसले, आमदार गोपीचंदजी पडळकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

 

Most Popular

To Top