माझं लातूर परिवाराकडून निटूर येथील शाळेस व महाविद्यालयास भारताचे संविधान उद्देशिका देण्यात आले

महाराष्ट्र खाकी ( निलंगा / प्रशांत साळुंके ) – निलंगा तालुक्यातील निटूर येथे माझं लातूर परिवाराकडून समाजोपयोगी आणि दिशादर्शक उपक्रमाच्या माध्यमातून भारताचे संविधान उद्देशिका अभ्यासपूर्ण वाचन विद्यार्थ्यांना होण्यासाठी जिल्हा परिषद प्रशाला,महाराष्ट्र विद्यालय,छञपती शाहू महाविद्यालय,निटूर मध्ये माझं लातूर परिवारातील सदस्यांकडून शालेय व महाविद्यालयास उद्देशिका देण्यात आले.

माझं लातूर परिवाराकडून निटूर येथील सक्रिय सदस्य पञकार राजकूमार सोनी,के.वाय.पटवेकर,प्रशांत साळुंके,एस.आर.काळे यांनी शैक्षणिक विभागातील शालेय आणि महाविद्यालयात जाऊन ह्या उद्देशिका विद्यार्थी,शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचार्‍यांसमावेत देण्यात आल्या.प्रत्येक विद्यार्थ्यांना उद्देशिकेचे महत्त्व कळण्यासाठी भारताचे संविधान महत्त्वाची भूमिका असल्याचे मत याप्रसंगी माझं लातूर परिवारातील सदस्यांनी सांगितले.

याप्रसंगीजि.प.प्रशाला,निटूर,महाराष्ट्र विद्यालय,निटूर,छञपती शाहू महाविद्यालय,निटूर येथील विद्यार्थी,शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच माझं लातूर परिवारातील सदस्य यांची उपस्थिती होती. माझं लातूर परिवारातील प्रमुख तथा पञकार सतिश तांदळे अन्य जणांनी निटूर येथील उद्देशिका शालेय व महाविद्यालयास देण्यात आल्याने सदस्यांचे कौतूक केले आहे.

Recent Posts