महाराष्ट्र खाकी ( परळी ) – सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या संकल्पनेतून परळीत सुरू असलेल्या तीन दिवसीय भीम महोत्सवात शनिवारी सायंकाळी 7 वा. प्रसिद्ध सिनेगायक आदर्श शिंदे यांच्या भीमगीतांची मैफल रंगणार असून, या कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन महोत्सव समितीने केले आहे.
परळी शहरात धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वात विविध महापुरुषांची जयंती उत्सव स्वरूपात साजरी करण्याची परंपरा आहे. कोविड काळातील दोन वर्षांच्या खंडानंतर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती राज्यभरात धनंजय मुंडे यांच्या संकल्पनेतून साजरी होत आहे. यालाच अनुसरून परळीत तीन दिवसीय भीम महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
याअंतर्गत शुक्रवारी सायंकाळी उदय साटम यांच्या 75 कलाकारांच्या चमुसह ‘वंदन भीमराया’ या कार्यक्रमास परळीकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळला. यापाठोपाठ शनिवारी सायंकाळी 7 वा. शहरातील मोंढा मैदान येथे आदर्श शिंदे यांच्या भीम गीतांची मैफल रंगणार आहे.