नांदेड मधील प्रसिद्ध बांधकाम व्यवसायिक संजय बियाणी यांचा उपचारा दरम्यान मृत्यू, घरासमोर सकाळी झाला होता गोळीबार

महाराष्ट्र खाकी ( नांदेड ) – सध्या गुन्हेगारीचे प्रमाण चांगलेच वाढले आहे असे दिसून येत आहे. पैशासाठी गुन्हेगार मोठ्या व्यापाऱ्याना लक्ष करत आहेत. किंवा व्यपारात स्पर्धा इतकी वाढली आहे की एकमेकांचा जीव घेण्यापर्यंत कारवाया होत आहेत. अशीच एक घटना आज (दि.5 मंगळवार ) सकाळी घरासमोरील गोळीबाराच्या घटनेत गंभीर जखमी झालेल्या शहरातील नामवंत बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी यांचा

उपचारादरम्यान दुपारी 1 वाजेच्या दरम्यान मृत्यू झाला. आज सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास बियाणी यांच्या शारदा नगर येथील घरासमोर दुचाकीवर येऊन अज्ञात दोघांनी गोळी झाडल्या या गोळीबारात संजय बियाणी आणि त्यांचा चालक गंभीर जखमी झाला होता. त्यांच्यावर शहरातील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते परंतु उपचारादरम्यान  दरम्यान संजय बियाणी यांचा मृत्यू झाला.

संजय बियाणी यांचे नांदेडमध्ये मोठे प्रस्थ असून व्यावसायिक स्पर्धेतून किवा खंडणीच्या वसुलीसाठी हा हल्ला झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. दरम्यान, मागील वर्षी बियाणी यांना खंडणी साठी जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. त्यांच्या कार्यालयात घुसून कुप्रसिद्ध गुंड रिंधाच्या नावे त्यांना खंडणी मागण्यात आली होती.

तेव्हा मोठ्या शिताफीने बियाणी यांनी, मी बियाणी नसल्याचे सांगून मोठ्या हुशारीने हल्ला परतवून लावला होता. त्यानंतर त्यांना सुरक्षा रक्षक देण्यात आला होता. परंतु काही दिवसांपूर्वी त्यांचा सुरक्षा रक्षक काढण्यात आला होता. त्यानंतर त्यांच्यावर घरासमोरच हल्ला झाल्याने खळबळ उडाली या हल्यात संजय बियाणी यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे

Recent Posts