मांजराप्रमाणे तेरणा पट्याचाही विकास – पालकमंञी अमित देशमुख

महाराष्ट्र खाकी ( निलंगा / प्रशांत साळुंके ) – डाॅ.शिवाजीराव पाटील निलंगेकर सहकारी साखर कारखाना हा मांजरा परिवारात सामिल करून घेण्यासाठी शेतकर्‍यांची मागणी लक्षात घेऊन निलंगा तालुक्याच्या विकासाची गुढी उभा करण्याचा संकल्प गुढीपाडव्याच्या निमित्ताने केला आहे.दिवाळीपर्यंत गळीत हंगाम सुरू केला जाईल.मांजराप्रमाणे तेरणा पट्टयाचाही विकास केला जाईल,असे प्रतिपादन पालकमंञी अमित विलासराव देशमुख यांनी येथे केले.

अंबुलगा येथील डाॅ.शिवाजीराव पाटील निलंगेकर साखर कारखान्याचे मशिनरी पूजन त्यांच्या हस्ते झाले.यावेळी पालकमंञी अमित विलासराव देशमुख म्हणाले,उस उत्पादकांना चांगला भाव देऊन तालुक्यात आर्थिक क्रांती घडवणार आहे.कारखाना चालू झाल्याने तालुक्याची आणि शहराची आर्थिक समृद्धी होणार आहे.भविष्यात वीजनिर्मिती,इथेनाॅल,बायोगॅस,एव्हिएशन फ्ल्यू ( विमानाला लागणारे इंधन) इथे तयार करण्यात येणार आहे.

याप्रसंगी मंचावर श्रीशैल्य उटगे,आबासाहेब पाटील,सूर्यशीला मोरे,संजय मोरे,गणपतराव बाजुळगे,काॅंग्रेसचे प्रदेश सचिव अभय साळुंके,प्रमोद जाधव,सचिन दाताळ आदी मान्यवर उपस्थित होते.प्रास्ताविक प्रकाश सलगर तर आभार अजित माने यांनी मानले.

काॅंग्रेस कार्यकर्त्यांनी कामाला लागावे…

निलंगा आमच्या मामाचे गाव आहे.आमची बांधिलकी आहे.निलंगा लातूरचे संबंध पिढ्यानपिढ्याचे आहे.काॅंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आता कामाला लागावे. आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत.लोकांची कामे करा,प्रत्येक उंबर्‍यापर्यंत विकास गेला पाहिजे.गावचा विकास करण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ( निवडणुका जिंकणे गरजेचे आहे,असेही पालकमंञी देशमुख म्हणाले.

आमचे राजकारण विकासाचे- आ.धीरज देशमुख
आ.धीरज देशमुख म्हणाले,आम्ही विकासाचे राजकारण करतो,मांजरा परिवाराने आजवर 44 लाख मेट्रिक टन गाळप करून नऊशे कोटी रूपये वाटप केले आहे.आणखी हा आकडा बाराशे कोटीपेक्षा जास्त होईल.शेतकर्‍यांची स्वप्नपूर्ती करण्यासाठी कारखाने चालू केले आहेत.प्रदेश

सरचिटणीस अशोकराव पाटील निलंगेकर म्हणाले,लातूर जिल्हा मध्यवर्ती बॅंक अंबुलगा कारखान्यालाही मदत करेल.आदरणीय दादासाहेबांनी मोठ्या कष्टातून हा कारखाना उभा केला.माञ यात राजकारण घुसले बॅंकेने साथ दिली नाही.दुष्काळ,अवर्षण आदी संकटाला तोंड देता देता बॅंकेचे व्याज वाढले,त्यातूनच कारखाना बंद पडला.

Recent Posts