महाराष्ट्र

विकासाच्या आड याल तर तुमचा करेक्ट कार्यक्रम करू आमचा नाद करायचा नाही – आमदार धिरज देशमुख

महाराष्ट्र खाकी (निलंगा) – लातूर जिल्ह्यातील काही सहकारी साखर बंद होते यातील दोन कारखाने मांजरा परिवाराने म्हणजे देशमुखांनी चालवायला घेतले आहेत, काल पाडव्याचा मुहूर्त साधून कारखान्याची दुरुस्तीचे काम पूजा करून चालू केले. लातूर जिल्ह्यातील शिल्लक राहिलेल्या ऊसाच्या प्रश्नावरून मागील काळात संभाजी पाटील निलंगेकर यांनी पालकमंत्री अमित देशमुख यांच्यावर टीका केली होती. अमित देशमुख यांनी या टीकेला थेट संभाजी पाटील निलंगेकर यांच्या आजोबांच्या नावाने असलेला साखर कारखाना चालवायला घेत उत्तर दिले.

अमित देशमुख यांच्या उपस्थितीतीत आमदार धिरज देशमुख यांनी या संधीचा फायदा घेत संभाजी पाटील निलंगेकर यांच्यावर निशाणा साधला. आमदार धिरज देशमुख म्हणाले की,काँग्रेस आहे, चालत राहते, शांत आहे, पण यापुढे असे चालणार नाही. आम्ही जोपर्यंत शांत आहोत तो पर्यंत राहू द्या, विकासाच्या आड याल तर तुमचा करेक्ट कार्यक्रम करू.आमचा नाद करायचा नाही. वैद्यकीय

शिक्षण खाते आमच्याकडे असल्यामुळे इंजेक्शन कधी व कुठे द्यायचे आम्हाला पक्के माहीत आहे, इंजेक्शन कधी दिले हे कळणार ही नाही असा टोला लातूर ग्रामीणचे आमदार धीरज देशमुख यांनी माजी पालकमंत्री आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांना नाव न घेता लगावला
लातूर जिल्ह्यातील कारखान्यांनी आतापर्यंत 44 लाख टन ऊसाचे गाळप केले आहे. यातून शेतकऱ्यांना 968 कोटी

रूपये बिलापोटी दिले आहेत. शेतकऱ्यांच्या नववर्षाची सुरवात असून हा कारखाना सुरू करावा अशी अनेक वर्षांची मागणी होती. माजी पालकमंत्र्यांनी कारखाना चालू करावा अशी मागणी केली होती. मात्र सध्याचे विद्यमान पालकमंत्री अमित देशमुख यांनी हा कारखाना चालू केला, हा दोन नेत्यामधील फरक आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांची

स्वप्नपुर्ती करण्यासाठी कारखाने चालू केले पाहिते. मांजरा परिवारात आलेले सर्व कारखाने पूर्ण क्षमतेने चालवू ऊसाला रास्त भाव देऊ, आर्थिक समृद्धी आता या अंबुलगा परिसरात करायची आहे. अंबुलगा कारखान्याला सुध्दा लातूर जिल्हा मध्यवर्ती बँक मदत करेल, अशी ग्वाही देखील लातूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे चेअरमन तथा आमदार धिरज देशमुख यांनी दिली.

 

 

Most Popular

To Top