आमदार अभिमन्यू पवार यांनी तेरणा खोलीकरणासाठी घेेतली भारतीय जैन संघटनेचे शांतीलाल मुथा यांची भेट..

महाराष्ट्र खाकी ( औसा / प्रशांत साळुंके )– तेरणा नदीपात्राचे खोलीकरण व रुंदीकरण कामासाठी आमदार अभिमन्यू पवार यांनी पुढाकार घेतला असून या कामामुळे हजारो शेतकऱ्यांना दूरगामी फायदा होणार आहे. या अनुषंगाने दि.32 मार्च रोजी आमदार अभिमन्यू पवार यांनी पुणे येथे भारतीय जैन संघटना तथा शांतीलाल मुथा फाऊंडेशन चे संस्थापक शांतीलाल मुथा यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. यावेळी शांतीलाल मुथा यांनी या कामासाठी आवश्यक ते सहकार्य आणि मार्गदर्शन देण्याचा शब्द दिला आहे.

माकणी ते औराद शहाजनी पर्यंत सुमारे 40 किमी लांबीच्या तेरणा नदीपात्राचे खोलीकरण व रुंदीकरण कामासाठी परवानगी देण्याची मागणी आमदार अभिमन्यू पवार यांनी विधीमंडळ अधिवेशनादरम्यान सभागृहात तसेच जलसंधारणमंत्री जयंती पाटील यांच्याकडे केली आहे. सामाजिक संघटनांकडून मशिनरी तसेच जनसुविधा व आमदार निधीतून डिझेल उपलब्ध

करून घेवून हे महत्वकांक्षी कार्य मार्गी लावण्याच्या अनुषंगाने पुणे येथे भारतीय जैन संघटना तथा शांतीलाल मुथा फाऊंडेशन चे संस्थापक शांतीलाल मुथा यांची आमदार अभिमन्यू पवार यांनी भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. या भेटी दरम्यान शांतीलाल मुथा यांनी या कामासाठी आवश्यक ते सहकार्य आणि मार्गदर्शन देण्याचा शब्द दिला आहे.

जल शक्ती मंत्रालयाच्या सहकार्यातून देशातील काही निवडक जिल्ह्यांमध्ये जलसंधारणाच्या कामांचे एक महत्वकांक्षी अभियान आदरणीय शांतीलाल राबवणार असून त्यासंदर्भातही सविस्तर चर्चा करून या अभियानात लातूर जिल्ह्याचाही समावेश करावा अशी विनंती या भेटीत आ. अभिमन्यू पवार यांनी त्यांना केली. निम्न तेरणा प्रकल्प तसेच खोलीकरण नियोजित असलेल्या

नदीपात्राचा काही भाग उमरगा – लोहारा मतदारसंघात येत असल्याने उमरगाचे आमदार ज्ञानराज चौगुले हेही या भेटी दरम्यान उपस्थित होते. या अगोदर अभिमन्यू पवार यांनी भारतीय जैन संघटनेचे संस्थापक शांतीलाल मुथा यांची यांच्याकडे औसा मतदारसंघातील शेतरस्ते,नाला खोलीकरण व सरळीकरण, कंपार्टमेंट बंडिंग कामा संदर्भात माहिती देवून त्याच्याकडे या कामासाठी मशिनरी

देण्यात विनंती केली होती. त्यानुसार भारतीय जैन संघटनेच्या मशिनरीकडून प्रत्यक्ष काम करण्यात आले आहे.या नंतर पुन्हा तेरणाच्या खोलीकरण व सरळीकरणास कामासंदर्भात आवश्यक मदतीसाठी भारतीय जैन संघटनेचे संस्थापक शांतीलाल मुथा यांच्याकडे साकडे घातले असून यासाठी त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. आ. अभिमन्यू पवार यांनी हाती घेतलेल्या या महत्वकांक्षी कामामुळे शेतकऱ्यांचा मोठा फायदा होणार आहे.

Recent Posts

कुटुंबातील आणि मित्र परिवारातील प्रत्येक मतदाराला 20 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुकीसाठी मतदानासाठी प्रोत्साहित करावे – जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी वर्षा ठाकूर – घुगे