PI सुधाकर बावकर यांची कौतुकास्पद कामगिरी… चोरीच्या 19 मोटरसायकलसह 1 आरोपी अटक

महाराष्ट्र खाकी (लातूर) – लातूर पोलिस दलात सिंघम म्हणून ओळख असलेले पोलिस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नावानेच गुन्हेगार गुन्हा करण्या अगोदरच दोन पाऊल मगे जातो असा दबदबा, भीती गुन्हेगारांमध्ये आहे. सुधाकर बावकर यांच्याकडे एखादा गुन्हा तपासासाठी आला आणि त्या गुन्ह्यांची उकल जलद गतीने होते हे सर्वांनाच माहीती आहे. असाच एक गुन्हा उघडकीस आणण्यासाठी सुधाकर बावकर यांनी केलेल्या कारवाईत सापडलेला आरोपी

अगोदरच्या गुन्ह्याची कबुली दिली आणि परत एकदा सुधाकर बावकर यांची कौतुकास्पत दिसून आली. विवेकानंद चौक पोलिस स्टेशन , लातूर येथील पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वात पोलिस स्टेशनचे पोलिस अधिकारी व अंमलदार यांचे गुन्हेगार पकडण्यासाठी आणि गुन्हे उघडकीस आणण्यासाठी विशेष पथक तयार करण्यात आले होते. विवेकानंद चौक पोलीस स्टेशन लातूर येथे दिनांक 28/ 03/2022 रोजी एक मोटारसायकल चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या गुन्ह्याच्या तपासकामी वरिष्ठांचे मार्गदर्शनात हे पथक रवाना करून गुन्ह्यात चोरीस गेलेल्या मोटरसायकलचा शोध घेत असताना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून आरोपी अखिल महबूब शेख, वय 34 वर्षे, राहणार हबीबपुरा परळी जिल्हा बीड, सध्या राहणार शाम, नगर लातूर. यास श्याम नगर परिसरातून पोलिसांनी ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडे अधिक विचारपूस केली असता त्यांनी एम. आय.टी. कॉलेज पार्किंगमध्ये लावलेली स्प्लेंडर मोटर सायकल चोरी केल्याचे कबूल केले.

या आरोपीकडे आणखीन सखोल तपास केला असता त्यांनी लातूर शहर, उदगीर, माळाकोळी, अंबाजोगाई, बीड, औरंगाबाद, उस्मानाबाद, शिक्रापूर, पुणे येथील विविध ठिकाणाहून मोटरसायकल चोरी केल्याचे सांगून त्यांने चोरलेल्या मोटारसायकली पैकी 19 मोटारसायकली जप्त करण्यात आलेल्या आहेत. अधिक तपास पोलिस करीत आहेत. या आरोपीस पोलिस ठाणे विवेकानंद चौक येथे दाखल असलेले गुन्हा रजिस्टर क्रमांक 189/ 2022 कलम 379 भादवी मध्ये दिनांक 02/04/2022 रोजी अटक करण्यात आली आहे.

या कारवाईत विवेकानंद चौक पोलिस स्टेशन व उपविभाग लातूर शहर येथील विशेष पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक भाऊसाहेब खंदारे, पोलिस उपनिरीक्षक महेश गलगट्टे, पोलीस उपनिरीक्षक जिलानी मानूला, पोलीस उपनिरीक्षक बालाजी गोणारकर,  सहायक फौजदार बुड्डे पाटील, वाहिद शेख, रामचंद्र ढगे, पोलीस अमलदार मुन्ना पठाण, संजय कांबळे ,रामलिंग शिंदे ,दयानंद सारोळे, महेश पारडे, विनोद चलवाड, खंडू कलकत्ते, रमेश नामदास यांचा समावेश होता.

Recent Posts