महाराष्ट्र

लातूर जिल्हा पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांची अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कार्यालयास भेट

महाराष्ट्र खाकी ( उदगीर / प्रशांत साळुंके ) – उदगीर येथील महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात 22 ते 24 एप्रिल 2022 रोजी होणाऱ्या अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे 95 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कार्यालयास जिल्हा पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी भेट देऊन परिसराची पाहणी केली व आवश्यक त्या सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या.

त्यानंतर झालेल्या कार्यक्रमात बोलताना पिंगळे म्हणाले विद्यार्थ्यांनी ज्या गोष्टी आपल्याला आवडतात त्या मन लावून केल्या पाहिजेत. प्रयत्नाला दिशा असणे अत्यंत आवश्यक आहे कोणत्याही क्षेत्रात यश मिळवायचे असेल तर सर्वप्रथम त्याची पूर्ण माहिती करून घ्या त्यानंतर नियोजनबद्ध प्रयत्न केल्यास यश दूर नाही. यावेळी महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी सचिन मुंडे यांची जम्मू

काश्मीर येथे सैन्य दलात भरती झाल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. मंचावर कार्याध्यक्ष बसवराज पाटील नागराळकर ,मुख्य कार्यवाह रामचंद्र तिरुके, संस्थेचे सचिव प्रा.मनोहर पटवारी सहसचिव डॉ. श्रीकांत मध्वरे,कोषाध्यक्ष महादेव नौ बदे, नामदेवराव चामले,प्रभारीप्राचार्य डॉ. आर.आर. तांबोळी, उपप्राचार्य डॉ. आर. के. मस्केयांची उपस्थिती होती. सूत्रसंचालन प्रा. डॉ. गौरव जेवळीकर यांनी केले.

Most Popular

To Top