महाराष्ट्र खाकी ( उदगीर / प्रशांत साळुंके) – अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या 95 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयातील कार्यालयास हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे खा. धैर्यशील माने यांनी भेट देऊन संमेलन तयारीचा आढावा घेतला. उपस्थित मान्यवरांचे संमेलनाचे कार्याध्यक्ष बसवराज पाटील नागराळकर ,प्रभारी प्राचार्य डॉ. आर.आर. तांबोळी उपप्राचार्य डॉ. आर. के. मस्के यांनी शाल व ग्रंथ भेट देऊन स्वागत केले.
यावेळी माजी महापौर संजय मोरे, जिल्हाप्रमुख बालाजी रेड्डी, उपजिल्हाप्रमुख रामचंद्र आदावळे,महिला आघाडी प्रमुख सुनिता चाळक, नामदेव चाळक, तालुकाप्रमुख चंद्रकांत ट ग टोल ,अंकुश कोंनाळे, जयवंत लाड यांची उपस्थिती होती यावेळी बोलताना खासदार धैर्यशील माने म्हणाले महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालय हे विद्यार्थ्यांच्या पंखांना बळ देणारे महाविद्यालय असून मराठी भाषेच्या समृद्ध ते मध्ये संमेलनामुळे भर पडेल.
प्रत्येकाने मातृभाषेचा रास्त अभिमान बाळगावा. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी शिवसेना प्रयत्नशील असून केंद्र सरकारी अनुकूलता दर्शविली आहे .भाषेचा गोडवा बोलीभाषेमध्ये असल्यामुळे आपल्या भाषेचा अधिकाधिक वापर करावा. भाषेमुळे मन आणि भावना जिंकता येतात.
नागराळकर म्हणाले साहित्य संमेलनाच्या आयोजनातून मैत्रीभाव एकोपा निर्माण होत असतो. भाषा समाजाला जोडणारा महत्त्वाचा दुवा आहे भाषिक श्रीमंतीचा प्रचार-प्रसार करण्यासाठी साहित्य संमेलन आहे .प्रास्ताविक सपना बिरादार हिने केले. सूत्रसंचालन अश्विनी भालेराव हिने केले. आभार कृष्णा केंद्रे यांनी मानले.