महाराष्ट्र

लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निलंगा बाजार समिती मार्केट शाखेच्या नूतन इमारतीचे भूमिपूजन संपन्न

महाराष्ट्र खाकी ( निलंगा / प्रशांत साळुंके )- राज्यात अव्वल स्थानावर असलेल्या लातूर जिल्हा बँक माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्या बरोबर कमी वेळात अधीक उत्तम सेवा देण्याचा प्रयत्न करून शेतकऱ्यांचा विकासाचा पाया रचला असून निलंगा येथील व्यापारी आडते बाजार समितीत लोकांना प्रशस्त इमारतीत अधिक चांगली सेवा जिल्हा बँक देईल अशी माहिती जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अँड प्रमोद जाधव यांनी येथे बोलताना सांगितले ते २४ मार्च रोजी गुरुवारी लातूर

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निलंगा बाजार समिती मार्केट शाखेच्या नूतन इमारती चा भूमिपूजन समारंभ आयोजित करण्यात आला होता त्यावेळी ते बोलत होते यावेळी प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा बँकेचे जेष्ठ संचालक अशोकराव पाटील निलंगेकर,संचालक पृथ्वीराज शिरसाठ, संचालक व्यंकटराव बिरादार जयेश माने, अनुप शेळके, संचालिका सौ स्वयंप्रभा पाटील, सौ सपना कीसवे, सौ अनिता केंद्रे, कार्यकारी संचालक हणमंत जाधव, निलंगा तालुका काँग्रेस अध्यक्ष विजयकुमार पाटील उपस्थित होते

निलंगा तालुक्यातील अनेक शाखा लवकरच प्रशस्त इमारतीत सेवा देतील – संचालक अशोकराव पाटील निलंगेकर

लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मार्गदर्शक राज्याचे माजी मंत्री दिलीपराव देशमुख साहेब यांचे खंबीर नेतृत्व असल्याने बँकेने शेतकऱ्यांना आर्थिक सुबत्ता देण्याबरोबरच ऐतिहासिक निर्णय घेउन स्वावलंबी बनवले शिक्षण, बचत गट, रेशीम उद्योग, चॉकी सेंटर आदींना कर्ज दीले त्यामुळें शेतकरयांना आर्थिक मदत मिळाली पाच लाख रुपयांपर्यंत शून्य दराने कर्ज वाटप करणारी लातूर बँक देशात पहिली ठरलेली आहे याचे पुर्ण श्रेय दिलीपराव

देशमुख साहेब यांच्या कडे जाते असे सांगून नूतन चेअरमन आमदार धीरज देशमुख यांच्या नेतृत्वाखाली फास्ट चांगले निर्णय घेण्याची क्षमता असल्याने या ठिकाणची होत असलेली प्रशस्त इमारत मुदतीत व्हावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त करून तालुक्यातील औराद, कासार शिर्शि,नी टूर शाखेचा लवकरच प्रशस्त इमारतीचे काम मार्गी लावण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत अशी माहिती संचालक अशोकराव पाटील निलंगेकर यांनी बोलताना यावेळी दिली

याप्रसंगी कृषि उत्पन्न बाजार समिती चे सचिव संतोष पाटील, संचालक व्यंकटराव जाधव, सतीश नाईकवाडे, बालाजी गोम साळे, जिल्हा बँकेचे वसूली व्यवस्थापक व्हि.जी. शिंदे, माध्यम समन्वयक हरिराम कुलकर्णी, बँकिंग ऑफीसर सुनील पाटील, तालुका फील्ड ऑफिसर माने, शाखा व्यवस्थापक वागदरे , ठेकेदार गजानन देशमुख, आर्किटेक्चर अनंत गाडे, पंचायत समिती सदस्य महेश देशमुख उपस्थित होते

कार्यक्रमाचं सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन सुनिल पाटील यांनी केले.लातूर जिल्हा बँकेच्या निलंगा मार्केट शाखेच्या नूतन इमारती भूमीपूजन बँकेचे व्हॉईस चेअरमन अँड प्रमोद जाधव संचालक अशोकराव पाटील निलंगेकर यांच्या हस्ते संचालक पृथ्वीराज शिरसाठ, जयेश माने, व्यंकट बिरादार, अनूप शेळके, सौ स्वयंप्रभा पाटील सौ सपना कीसवे, सौ अनिता केंद्रे, विजयकुमार पाटील आदी मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.

Most Popular

To Top