पोलीस

लातूर LCB चे पोलिस निरीक्षक गजानन भातलवंडे यांच्या नेतृत्वात 3 गावठी कट्टे,11 जिवंत काडतुसासह एकास अटक करून मोठी कार्यवाही

महाराष्ट्र खाकी (लातूर) – लातूर जिल्ह्यात LCB चे पोलिस अधीक्षक गजानन भातलवंडे यांच्या नेतृत्वात गुन्हेगारीस आळा घालण्यास LCB टीमला चांगले यश मिळत आहे. मागील काही दिवसात LCB ची हि सर्वात मोठी कारवाई म्हणावी लागेल . लातूर (LCB) स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन भातलवंडे यांच्या नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखेच्या टीमने लातूर येथील एकास ताब्यात घेऊन तीन गावठी कट्टे ( पिस्टल) सह अकरा जिवंत काडतुसे, दोन एक्स्ट्रा मॅगझीन असा एकूण 1 लाख 81 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे

लातूर (LCB) स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांना गुप्त बातमीदार मार्फत मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारावर (LCB)स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने लातूर शहरातील समीर सत्तार शेख (पांढरे )रा.इंडिया नगर लातूर यास ताब्यात घेऊन त्याच्याकडून एक गावठी पिस्टल आणि नऊ जिवंत राऊंड जप्त केली. त्याच्याकडे पिस्टल आणि राउंड विषयी सखोल चौकशी केली असता. त्याने दिलेल्या माहितीच्या आधारावर स्थानिक गुन्हे

शाखा(LCB) पोलिसांनी अधिक तपास करून आणखीन एका व्यक्तीच्या घरातून दोन गावठी कट्टे पिस्टल, दोन मॅगझीन आणि दोन जिवंत काडतुसे असा एकूण 1 लाख 81 हजार रुपयाचा अवैध शस्त्र साठा जप्त केलेला आहे याप्रकरणी MIDC पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर 161/2022 कलम 3( 25 ) भारतीय हत्यार कायदा अन्वये गुन्हा नोंद झालेला असून MIDC पोलिस पुढील तपास करीत आहेत

हि कारवाई ही लातूर (LCB) स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन भातलवंडे यांचे नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल बहुरे, पोलीस अंमलदार खुर्रम काजी ,विनोद चीलमे, बालाजी जाधव, रवी गोंदकर ,दिनेश देवकते ,प्रमोद तरडे ,अंगद कोतवाड , यशपाल कांबळे ,संपत फड, राजेश कंचे, प्रदीप चोपणे, यांनी केली आहे

Most Popular

To Top