महाराष्ट्र खाकी (लातूर) – लातूर जिल्ह्यातील शिरूर अनंतपाळ येथील काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी डॉ. अरविंद भातांब्रे यांची महराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीकडून लातूर डॉक्टर सेलच्या जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
त्यांचे नियुक्तीपत्र माजी मंत्री, सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांच्या हस्ते लातूर येथे त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. डॉ. अरविंद भातांब्रे शिरूर अनंतपाळ येथील असून त्यांनी केलेल्या सामाजिक क्षेत्रातील कार्याबरोबरच त्यांच्या वैद्याकीय क्षेत्रातील कार्या विचारात घेऊन आणि त्यांनी केलेल्या पक्षकार्याची दखल घेऊन त्यांची लातूर काँग्रेस डॉक्टर सेलच्या जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. या नियुक्तीबद्दल डॉ.अरविंद भातांब्रे यांनी पक्षाचे आणि नेत्यांचे आभार मानले आहेत. आणि काँग्रेस पक्षाचा विचार सामान्य माणसापर्यंत पोहचंवण्याचं कार्य करेन असा विश्वास वेक्त केला.
या निवडी बद्दल माजी मंत्री, सहकार महर्षी दिलीपराव देशमुख, लातूर जिल्हयाचे पालकमंत्री अमित विलासराव देशमुख, लातूर ग्रामिणचे आमदार धीरज विलासराव देशमुख यांनी अभिनंदन करून डॉ.अरविंद भातांब्रे यांना पूढील पक्षकार्यासाठी शुभेच्छा दिल्या यावेळी लातूर जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष श्रीशेल उटगे दादा, सोनू डगवाले जी उपस्थित होते.