महाराष्ट्र खाकी ( मुंबई ) – बोगस डॉक्टरांना आळा घालण्यासाठी सध्या असलेल्या राज्यातील समित्यांची आणि भरारी पथकांची व्याप्ती वाढवली जाईल. त्यासोबतच ग्रामपंचायत स्तरावर असलेल्या डॉक्टरांची यादी ग्रामपंचायतीच्या नोटीस बोर्डावर लावण्यासाठी लवकरच GR काढला जाईल, अशी घोषणा वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी आज विधान परिषदेत केली.
राज्यातील बोगस डॉक्टरांकडून रुग्णांवर केल्या जात असलेल्या उपचारामुळे अनेकांचे बळी जात असल्याने त्याबाबत पदवीधर आमदार विलास पोतनीस यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. त्यात शिवसेनेच्या सदस्या मनीषा कायंदे, सुनील शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य अमोल मिटकरी आदींनी सहभाग घेत काही प्रश्न उपस्थित केले होते. गृह, आरोग्य आणि वैद्यकीय शिक्षण यापैकी कोणत्या विभागाने कारवाई करावी, हा प्रश्न आहे. त्यामुळे दिल्लीच्या धर्तीवर कारवाई करण्यासाठी अधिकारात वाढ करता येईल का, याचा विचार केला जाईल.
राज्यात सध्या बोगस डॉक्टरांवर कारवाई करण्यासाठी शहर, तालुका, जिल्हा स्तरावर वेगवेगळ्या समित्या आहेत. मात्र या समितीचे अधिकार आणि इतर बाबी लक्षात घेऊन त्यांची पुनर्रचना करण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी अशासकीय सदस्यांची समिती नेमून त्यांची व्याप्ती वाढवता येईल व या समित्या तालुकास्तरा केल्या जातील, अशी माहिती देशमुख यांनी दिली. सध्या असलेल्या भरारी पथकांची व्याप्ती वाढवून यासंदर्भातील आलेले प्रकरण जलदगती न्यायालयात सोडवण्यासाठी तयारी केली जाईल आणि याची सुरुवात सर्वाधिक बोगस डॉक्टर असलेल्या बीड जिल्ह्यांमधून केली जाईल, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.
ग्रामपंचायत स्तरावर बोगस आणि डॉक्टरांच्या नावाच्या नोंदणीचे वाचन करून त्यांच्या नावाची माहिती नोटीस बोर्डावर लावता येईल. त्यासाठी वैद्यकीय शिक्षण विभागाकडून लवकरच एक GR जारी केला जाईल व त्यासाठीच्या सूचना दिल्या जातील. बोगस डॉक्टरांची यादी जाहीर करून त्यासाठीची माहितीही दिली जाईल, असेही अमित देशमुख यांनी स्पष्ट केले.
लातूर मनपा वैद्यकीय विभागाकडून उत्कृष्ट कार्य चालू आहे
लातूर शहरात काही दिवसापूर्वी मनपा वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत माले यांनी एका बोगस डॉक्टरवर कारवाई केले आहे. आणि मनपा क्षेत्रात वैद्यकीय सुविधा वेवस्तीत आणि वाढली आहे. मग ते मोहल्ला क्लिनिक असो वा पोलिओ मोहीम असो सर्व गोष्टी डॉ. प्रशांत माले यांच्या नोयोजनात वेवस्तीत चालू आहेत. पण बोगस डॉक्टर वरील कारवाईबद्दल सर्वांनीच प्रतिक्रिया दिली पण महापौर आणि पालकमंत्री यांनी काहीच प्रतिक्रिया दिली नाही!