युक्रेन मधून महाराष्ट्रात परतलेल्या 250 विद्यार्थ्यांना भारतीय विद्यापीठांत सामावून घेण्यासंदर्भात धोरण निश्चित करण्यात येणार आहे – वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख

महाराष्ट्र खाकी ( मुंबई ) – रशिया आणि युक्रेन युद्धा मुळे युक्रेन मध्ये वैद्यकीय शिक्षणासाठी गेलेले विद्यार्थ्यांना वापस आणले. यात महाराष्ट्रातील 250 विदयार्थी आहेत. आता या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. या विद्यार्थ्यांचे शैक्षणीक नुकसान होऊ नये म्हणून राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी उपाययोजना करणार असल्याचे सांगितले आहे. युक्रेन मधून महाराष्ट्रात परतलेल्या 250 विद्यार्थ्यांची माहिती संकलित करून त्यांच्याशी संवाद साधून

विद्यार्थ्यांच्या पुढील अभ्यासक्रमासाठी उपाययोजना तसेच त्यांना भारतीय विद्यापीठांत सामावून घेण्यासंदर्भात धोरण निश्चित करण्यात येणार आहे. कुलगुरुच्या अभ्यासगटांची व्याप्ती वाढवून सकारात्मक दृष्टीने सर्व बाबींची तपासणी करून महिनाभरात अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले.कोणत्याही परिस्थितीत युक्रेनमधून परतलेल्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ देणार नाही,असेही अमित देशमुख यांनी सांगितले.

विधान भवन येथे युक्रेनमध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांबाबत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.विद्यार्थ्यांची मानसिक स्थिती पाहता त्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही यासाठी राज्य शासन सकारात्मक असल्याचे यावेळी स्पष्ट केले.

रशिया आणि युक्रेन देशाशेजारील 7 ते 8 देशांतही अभ्यासक्रम सारखाच असल्याने इतर देशांसोबत सामंजस्याने या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळेल का याबाबत चर्चा करण्याचा प्रस्ताव केंद्राला सादर करण्यात येईल असे अमित देशमुख म्हणाले भारतात पुन्हा येणा-या विद्यार्थ्यांना (नीट) सामायिक प्रवेश परिक्षा देण्यासही मानसिकरित्या तयार करावे लागेल. याचबरोबर ऑनलाईन पद्धतीने युक्रेन शासन शिक्षण देईल का यासंदर्भातही विचार करावा लागेल असे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख म्हणाले

भारतीय वैद्यकिय परिषद आणि महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ जे शिक्षण पूर्ण करून आंतरवासिता करीत आहेत त्यांना आधी काम द्यावे. जे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यांना येथील विद्यापीठात वर्ग, प्रयोगशाळा, ग्रंथालय वापरासाठी उपलब्ध करून देण्याची व्यवस्था करण्यात येईल त्यासाठी संबंधित देशाच्या विद्यापीठाशी चर्चा करण्यात येईल. कुलगुरूंचा जो अभ्यासगट नेमला आहे. त्यांनी या सुचनांचा अभ्यासासाठी अंतर्भाव करावा व अहवाल महिनाभरात सादर करावा. जेणेकरून शासनास धोरणनिश्चीतीसाठी त्याचा उपयोग होईल असेही यावेळी सांगितले.

या बैठकीस आमदार डॉ. मनिषा कायंदे, आमदार धिरज देशमुख, विभागाचे सचिव सौरभ विजय, आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ माधुरी कानिटकर, रूस एज्युकेशनचे उपाध्यक्ष लिंकन अमेरिकन विद्यापीठाचे कुलगुरू पवन कपूर, महाराष्ट्र वैद्यकिय परिषदेचे डॉ एस एस उत्तुरे आणि खाजगी विद्यापीठांचे प्रतिनिधी आणि अधिकारी उपस्थित होते.

 

Recent Posts