उदगीर शहरातील अमृत पाणी पुरवठा योजनाचे शिल्लक कामे एका महिन्याच्या आत पूर्ण करावेत –पाणीपुरवठा राज्यमंत्री संजय बनसोडे

 

महाराष्ट्र खाकी ( लातूर ) – उदगीर शहराला पाणीपुरवठा करणारी अमृत पाणीपुरवठा योजना त्वरित कार्यान्वित करण्यात यावी यासाठी पुढील एक महिन्यात या योजनेचे काम पूर्ण करण्याचे निर्देश राज्याचे पाणीपुरवठा सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी दिले आहे.

लातूर येथील शासकीय विश्रामगृहात या योजनेच्या प्रलंबित कामाचा आढावा घेण्यात आला. या बैठकीस जिल्ह्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी अरविंद लोखंडे, उदगीरचे उपविभागीय अधिकारी प्रवीण मंगशेट्टी, नगरपालिकेचे मुख्याधिकारी भरत राठोड, महावितरणचे कार्यकारी अभियंता श्री दराडे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता कायंदे उपस्थित होते.

उदगीर शहराची अमृत पाणीपुरवठा योजना ही एक महत्वाची योजना असून या योजनेद्वारे पाणी पुरवठा करण्यात येणार आहे. ही योजना लवकरात लवकर कार्यान्वित करण्यात येणार आहे. या योजनेतून जवळपास सहा हजार घरांना नळ कनेक्शन देण्यात आले आहेत. पुढील काळात आणखी चार हजार घरांना नळ कनेक्शन देण्यात येतील, या योजने साठी शहरात काही रस्ते खोदण्यात आले असून ते दुरुस्त करण्यात यावेत यासाठी प्रशासन यंत्रणेने समन्वय ठेवावा नगरपालिका व महाराष्ट्र जीवन प्रधिकरण महावितरण कंपनी व या योजनेवर काम करणारी कार्यान्वित यंत्रणा यांनी आपसात समन्वय साधावा असे त्यांनी यावेळी सुचित केले.

या योजनेतून पाणी पुरवठा करण्यासाठी सोलार प्रकल्पाचा वापर करण्यात येणार असून लिंबोटी, कुमठा येथून पाणी पुरवठा साठी सोलारचा वापराबाबत प्राथमिक माहिती घेण्यात आली आहे. या योजनेची शिल्लक राहिलेले कामे एका महिन्याच्या आत ही योजना कार्यान्वित करावी, असे निर्देश राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी दिले .

Recent Posts