महाराष्ट्र खाकी ( लातूर ) – लातूर ग्रामीण पोलीस स्टेशन येथील बेवारस असलेली एकूण 62 मोटार सायकल यांचा लिलाव बुधवार दिनांक 19 जानेवारी 2022 रोजी सकाळी 10.00 वाजता करण्याचे आयोजिले आहे. तरी ईच्छुकांनी पोलीस ठाणे,लातूर ग्रामीण येथे 200/- रुपये किंमतीच्या बाँडसह उपस्थित रहावे.असे पोलीस निरीक्षक, पोलीस ठाणे लातूर ग्रामीण यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.
पोलीस ठाणे लातूर ग्रामीण येथे बेवारस असलेल्या मोटारसायकलचा लिलाव करणेकामी प्रादेशिक परिवहन अधिकारी व तालुका दंडाधिकारी लातूर यांच्याकडून परवानगी घेतलेली आहे असे ही प्रसिध्दी पत्रकात नमुद केले आहे.