Home » Blog » Congress: केरळमध्ये सत्तेत येताच काँग्रेसमध्ये भूकंप, राहुल गांधींचा ‘हा’ खास नेता देणार राजीनामा? महाराष्ट्राशी आहे कनेक्शन | राष्ट्रीय बातम्या

Congress: केरळमध्ये सत्तेत येताच काँग्रेसमध्ये भूकंप, राहुल गांधींचा ‘हा’ खास नेता देणार राजीनामा? महाराष्ट्राशी आहे कनेक्शन | राष्ट्रीय बातम्या

Last Updated:

Kerala Congress: केरळचे मुख्यमंत्री म्हणून व्ही. डी. सतीशन यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. मात्र, आता या निर्णयानंतर काँग्रेसमध्ये अस्वस्थता निर्माण झाल्याची चर्चा सुरू झाली आहे.

केरळमध्ये सत्तेत येताच काँग्रेसमध्ये भूकंप! राहुल गांधींचा 'हा' खास नेता देणार राजीनामा; महाराष्ट्राशी काय आहे कनेक्शन?
केरळमध्ये सत्तेत येताच काँग्रेसमध्ये भूकंप! राहुल गांधींचा ‘हा’ खास नेता देणार राजीनामा; महाराष्ट्राशी काय आहे कनेक्शन?

नवी दिल्ली: केरळमध्ये १० वर्षानंतर सत्तेत पुनरागमन केलेल्या काँग्रेसने १० दिवसांच्या बैठकांनंतर मुख्यमंत्री म्हणून व्ही. डी. सतीशन यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. मात्र, आता या निर्णयानंतर काँग्रेसमध्ये अस्वस्थता निर्माण झाल्याची चर्चा सुरू झाली आहे. व्ही. डी. सतीशन यांच्या निवडीवर काँग्रेसमध्ये नाराजीचा स्फोट होण्याची शक्यता आहे. लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या जवळचे समजले जाणारे ज्येष्ठ नेते रमेश चेन्निथला राजीनामा देण्याची शक्यता आहे.

केरळमधील काँग्रेस पक्षात सध्या मोठे राजकीय वादळ येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पक्षातील ज्येष्ठतम नेते आणि माजी विरोधी पक्षनेते रमेश चेन्निथला हे आपल्याला बाजूला सारले जात असल्याच्या निषेधार्थ पदाचा राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. त्यांच्या या निर्णयामुळे केरळमध्ये काँग्रेसला मोठे खिंडार पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. रमेश चेन्निथला हे काँग्रेसचे महाराष्ट्राचे प्रभारी आहेत. त्यामुळे त्यांनी राजीनामा दिल्यास मोठा उलटफेर होण्याची शक्यता आहे.

केरळमध्ये काँग्रेसच्या नेतृत्वातील युडीएफला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत तीन जणांची नावे आघाडीवर होती. यामध्ये व्ही. डी. सतीशन, के. सी. वेणुगोपाल यांच्यासह रमेश चेन्निथला यांचा समावेश होता. काँग्रेस आमदारांनी दिलेली पसंती आणि स्थानिक समीकरणांचा विचार करून काँग्रेस हायकमांडने सतीशन यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले.

दुय्यम वागणूक, निर्णय प्रक्रियेत डावलल्याचा आरोप

गेल्या काही काळापासून केरळ काँग्रेसमध्ये फेरबदल आणि नवीन नियुक्त्यांच्या प्रक्रियेत चेन्निथला यांच्यासारख्या दिग्गज नेत्याला विश्वासात घेतले जात नसल्याची भावना त्यांच्या समर्थकांमध्ये आहे. हायकमांडकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत, स्वाभिमानासाठी पक्षाला सोडचिठ्ठी देण्याचा विचार चेन्निथला करत असल्याचे समजते.

समर्थक सामूहिक राजीनामा देणार?

महत्त्वाची बाब म्हणजे केवळ चेन्निथलाच नव्हे, तर त्यांच्या गटातील विधानसभेचे आमदार आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमधील पदाधिकारी देखील सामूहिक राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत. जर चेन्निथला यांनी टोकाचे पाऊल उचलले, तर त्यांच्यासोबत असलेला मोठा गट पक्षाला रामराम ठोकू शकतो. यामुळे राज्यातील काँग्रेसला मोठा धक्का बसण्याची चिन्हे आहेत.

हायकमांडसमोर मोठे आव्हान

राष्ट्रीय स्तरावर काँग्रेस स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करत असतानाच, केरळसारख्या मजबूत बालेकिल्ल्यात अंतर्गत गटबाजी उफाळून आल्याने हायकमांडची चिंता वाढली आहे. चेन्निथला यांच्यासारखा अनुभव असलेला नेता पक्षाबाहेर गेल्यास त्याचा परिणाम आगामी निवडणुकांवर होण्याची शक्यता आहे. सध्या पक्षातील वरिष्ठ नेते त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न करत असले, तरी चेन्निथला आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचे सूत्रांनी सांगितले.

मराठी बातम्या/देश/

Congress: केरळमध्ये सत्तेत येताच काँग्रेसमध्ये भूकंप, राहुल गांधींचा ‘हा’ खास नेता देणार राजीनामा? महाराष्ट्राशी आहे कनेक्शन

Share This News

Related Post

National