महाराष्ट्र खाकी (लातूर) – 3 ऑक्टोबर रोजी लखिमपुर खेरी येथे आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या अंगावरून गाड्यांचा ताफा घालून चार शेतकरी व एक पत्रकार ठार झाले. केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांच्या चिथावणी वरून त्यांच्या मुलाने शेतकऱ्यांचे आंदोलन दडपण्यासाठी केलेले कृत्य हे भारतीय इतिहासात जालियनवाला बाग हत्याकांडाची आठवण करून देणारे आहे.केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांची मंत्री मंडळातून हकालपट्टी करून कटात सहभागी असल्यामुळे त्यांना अटक झाले पाहिजे अशी मागणी होऊनही केंद्र सरकार त्यांना पाठीशी घालत आहे.तीन काळे कायदे रद्द करण्याऐवजी आंदोलन ऐनकेन प्रकारे कसे चिरडून टाकता येईल याच उद्देशाने केंद्र सरकार काम करत आहे.शेतकऱ्यांचे आंदोलन बळकट व्हावे याच उद्देशाने लखीम पुर खेरि येथील शहीद शेतकऱ्यांचा अस्थिकलश दि.1 नोव्हेंबर रोजी दुपारी 4 ते 6 वाजेपर्यंत जनतेच्या दर्शनासाठी महात्मा गांधी चौक, लातूर येथे ठेवण्यात येणार आहे.तसेच हुतात्मा शेतकऱ्यांसाठी अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले आहे.तरी या कार्यक्रमास किसान कामगार समन्वय समितीच्या सर्व घटक ,संघटना तसेच शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देणाऱ्या विविध पक्ष, संघटना,कार्यकर्ते,पदाधिकारी यांनी उपस्थित राहावे.असे आवाहन भाई उदय गवारे, अड.किरण जाधव, ॲड.विजय जाधव, ॲड.अण्णाराव पाटील,शिवाजी माने,का.सुधाकर शिंदे,प्रताप भोसले, प्रा. युवराज धसवाडीकर ,श्रीशैल्य उटगे,मकरंद सावे, डॉ.संजय मोरे,राजकुमार होळीकर, माधव बावगे,प्रशांत पाटील, प्रा.सोमनाथ रोडे,अंतेश्वर कुदरपाके,अड.भालचंद्र कवठेकर,किरण पवार,मोहसीन खान,अड.देविदास बोरुळे,रणधीर सूरवसे,महेश गुंड,श्रीनिवास बडूरे,अड.राहुल मतोळकर आदींनी केले आहे.
लखिमपूर येथील शहीद शेतकऱ्यांचा अस्थिकलश दि.1 नोव्हेंबर रोजी लातूर येथे येणार
- Maharashtra Khaki
- October 29, 2021
- 12:37 pm
Recent Posts
IIB NEWS दशरथ पाटील यांच्या IIB च्या अत्याधुनिक कम्प्युटर लॅब आणि प्रीमिअम कॅम्पस चे उद्घाटन
January 11, 2025
No Comments
क्रेडिट कार्डवर घेतलेल्या कर्जाची परतफेड न केल्याने बँकेच्या तगाद्याला कंटाळून निलंग्यातील तरुणाने संपवले जीवन
January 9, 2025
No Comments
Latur Jilha जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर – घुगे यांनी घेतला तंबाखू नियंत्रण समितीच्या कामाचा आढावा
January 7, 2025
No Comments
भारतीय किसान युनियनचे मराठवाडा प्रभारी मा. नेहरू देशमुख यांनी काळ्या आईची पूजा करून साजरी केली वेळ अमावस्या
December 31, 2024
No Comments