लातूर जिल्हा

महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी मनपाच्या आठशे कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड केली,12,500/ फेस्टिव्हल ॲडव्हान्स जमा

महाराष्ट्र खाकी (लातूर) – लातूर शहर महानगरपालिका मध्ये काँग्रेस आणि पालकमंत्री अमित देशमुख यांच्या जवळचे आणि विश्वासू म्हणून ओळख असलेले विक्रांत गोजमगुंडे हे महापौर म्हणून विराजमान झाल्यापासून मनपाचा कारभार उल्लेखनीय होत आहे. महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी पालकमंत्री अमित देशमुख यांच्या मार्गदर्शनात शहरात बरेच उपाययोजना, विकास कामे आणि सुविधा जाहीर केल्या आहेत. आणि त्याचे लातूरच्या जनतेने स्वागत केले आणि महापौर गोजमगुंडे यांचे कौतुकही केले. आता आणखी एक निर्णय विक्रांत गोजमगुंडे यांनी घेतला आहे त्यामुळे त्याचे आणखी कौतुक होत आहे दिवाळी पूर्वीच लातूर महापालिकेच्या आठशे कर्मचाऱ्यांना साडेबारा हजाराचा फेस्टिव्हल ॲडव्हान्स देण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. दरमहा 4 कोटी 12 लाख रुपये पगार दिवाळीनिमित्त हा पगार करण्यात आला आहे. यामध्ये सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचाही पगार देण्यात आला आहे. कर्मचाऱ्यांना 80 लाख रुपये फेस्टिव्हल ॲडव्हान्स दिला आहे.

Most Popular

To Top