महाराष्ट्र खाकी (लातूर) – लातूर जिल्ह्यातील औसा मतदारसंघाचे आमदार अभिमन्यू पवार यांच्या पदयात्रेची चर्चा आणि अभिमन्यू पवार यांचे जिल्ह्यात आणि राज्यात कौतुक होत आहे. अभिमन्यू पवार यांनी पहिल्यांदा विधानसभा लढवली आणि निवडून आले. विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या राजकीय तालमीत तयार झालेले अभिमन्यू पवार लातूर जिल्ह्यात आणि राज्यच्या राजकारणात आपले स्थान निर्माण केले आहे. कुठलीही राजकीय वारसा नसताना हे यश मिळवणे सोपे नव्हते. याचे सर्व श्रेय जाते ते फक्त देवेंद्र फडणवीस यांना फडणवीसांनी टाकलेला विश्वासाला कुठलाही तडा जाऊ दिला नाही. देवेंद्र फडणवीस हे जनतेच्या प्रश्नांना प्रथम प्राधान्य देतात आणि राजकारण करतात याचा आदर्श ठेऊन अभिमन्यू पवार यांचे लोकसेवेचे कार्य चालू आहे. याचीच एक झलक शेतकऱ्यांसाठी काढलेल्या पदयात्रेत दिसून आली. आणि जनतेनेही मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला होता. राज्यतील भाजपच्या मोठया नेत्यांनी समर्थन आणि शुभेच्छा दिल्या.
लातूर जिल्ह्यात या यात्रेने अभिमन्यू पवार यांचे वेगळे स्थान निर्माण झाले आहे. आपल्या मतदारसंघात विकास कामाची गंगा पवार यांनी आणली आहे. शेत रस्त्याच्या माध्यमातून असो वा उद्योगा वाढवण्यासाठी पवार सतत प्रयत्नशील असतात. लातूर जिल्ह्यात औसा असा एकमेव मतदारसंघ आहे की सर्वात जास्त जनतेत आणि जनतेच्या कामासाठी देणारे एकमेव आमदार अभिमन्यू पवार आहेत. आणि असे लोक सुद्धा म्हणत आहेत. अभिमन्यू पवार यांचे कार्य पाहता पक्ष श्रेष्ठी खुश आहेत आणि जनताही खुश आहे. देवेंद्र फडणवीस यांचे बेरजेचे राजकारण आता अभिमन्यू पवार यांच्या माध्यमातून लातूर जिल्ह्यात दिसून येत आहे. पुढील काळात अभिमन्यू पवार यांच्याकडे लातूर जिल्हा भाजपची सूत्र आलीतर नवल नसावे असे चित्र त्यांच्या कार्यातून दिसत आहे. लातूर जिल्ह्यातील उदगीर विधानसभा आणि लातूर लोकसभा मधील चांगले कार्य करणाऱ्या लोकप्रतिनिधीना तिकीट नाकारून त्यानाच्यावर अन्याय झाला होता त्यामुळे ते काहीशे लातूर भाजप नेतृत्वावर नाराज आहेत. त्यांना सोबत घेऊन अभिमन्यू पवार यांनी या पदयात्रेस सुरुवात केली ही विशेष बाब आहे.
अभिमन्यू पवार यांच्या पदयात्रेची चर्चा राज्यभर, सत्ताधाऱ्यांची छुपी चर्चा
- Maharashtra Khaki
- October 20, 2021
- 9:24 am
Recent Posts
IIB NEWS दशरथ पाटील यांच्या IIB च्या अत्याधुनिक कम्प्युटर लॅब आणि प्रीमिअम कॅम्पस चे उद्घाटन
January 11, 2025
No Comments
क्रेडिट कार्डवर घेतलेल्या कर्जाची परतफेड न केल्याने बँकेच्या तगाद्याला कंटाळून निलंग्यातील तरुणाने संपवले जीवन
January 9, 2025
No Comments
Latur Jilha जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर – घुगे यांनी घेतला तंबाखू नियंत्रण समितीच्या कामाचा आढावा
January 7, 2025
No Comments
भारतीय किसान युनियनचे मराठवाडा प्रभारी मा. नेहरू देशमुख यांनी काळ्या आईची पूजा करून साजरी केली वेळ अमावस्या
December 31, 2024
No Comments