महाराष्ट्र खाकी (लातूर) – महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि विधानपरिषदेचे विरोधीपक्षनेते प्रवीण दरेकर यांचा लातूर जिल्हा अतिवृष्टी व पूरस्थिती पाहणी दौरा 3 आणि 4 तारखेला आहे असे प्रसिद्धीपत्रक लातूर भाजपा जिल्हा अध्यक्ष आणि विधानपरिषद आमदार रमेश अप्पा कराड यांनी काढले आहे. आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि विधानपरिषदेचे विरोधीपक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या दौऱ्याचा वेळ आणि ठीकाण दर्शवले आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे जिल्ह्यातील बहुतांश भागातील शेतकऱ्यांना भेटणार आहेत. अहमदपूर, चाकूर, औसा आणि निलंगा या तालुक्यातील पूरग्रस्त भागाणा जाणार आहेत. पण लातूरचे पालकमंत्री अमित देशमुख आणि धिरज देशमुख यांच्या मतदारसंघात फिरकणार सुद्धा नाहीत हे विशेष या वरून या दौऱ्याला मॅनेज दौरा असे म्हंटले जात आहे ! अगोदरच 2019 च्या विधानसभा निवडणुकीत दोन मतदार संघात वरच्या लेवलला सेटलमेंट झाली असा आरोपही संभाजी पाटील निलंगेकर यांनी केला होता. आता या दौऱ्यामध्ये लातूर आणि रेणापूर तालुक्याचा समावेश दिसत नाही याचे कारण काय ? अशी चर्चा जिल्ह्यात होत आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या दौऱ्यात या भागाणा का भेट देणार नाहीत ? का देवेंद्र फडणवीसांनी देशमुख बंधुच्या मतदारसंघात जायच नाही अशी काही सेटलमेंट झाली आहे का ? का लातूर आणि रेणापूर तालुक्यातील अती पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले नाही का? असे अनेक प्रश्न या दौऱ्यामुळे निर्माण होत आहेत. देवेंद्र फडणवीस हे रमेशअप्पा यांच्या घरी जाणार आहेत तेच रेणापूर ग्रामीण मतदारसंघातील शेतकऱ्यांना एखादी भेट दिली असती तर भाजपाच्या कार्यकर्त्यांना प्रेरणा, उत्साहा आणि ताकत मिळाली असती लातूर ग्रामीण मध्ये भाजपा आणि रमेशअप्पा कराड यांना मानणारा मोठा गट आहे आणि याचा फायदा येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीत होऊ शकत ! कधी नव्हे ते लातूर जिल्ह्यात रमेशअप्पा कराड यांच्यामुळे भाजपा चांगलीच सक्रीय झाली आहे .