लातूर जिल्ह्यातील पूर हा निसर्गनिर्मित नसून मानवनिर्मित आहे – प्रेरणा होनराव

महाराष्ट्र खाकी (लातूर) – मराठवाड्यात पावसामुळे पूर परिस्थिती निर्माण झाली आणि शेतकऱ्यांचे खूप मोठे नुकसान झाले. झालेल्या नुकसानीचा आणि पूरपरिस्थितीचा पाहणी दौरा विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर करत आहेत. दि. 3 आणि 4 रोजी ते लातूर जिल्हा दौरा करणार आहेत. लातूर जिल्ह्यात या पुरामुळे शेतकऱ्यांचे खूप मोठे नुकसान झाले आहे. या लातूर पूर परिस्तिथी बद्दल भाजप युवा मोर्च्याच्या प्रदेश सचिव प्रेरणा होनराव यांनी अभ्यास पूर्ण माहीती जनतेसमोर मंडली आहे आणि पालकमंत्री अमित देशमुख आणि सरकारच्या ढिसाळ कारभारावर प्रश्न चिन्ह उपस्तित केले आहेत. प्रेरणा होनराव म्हणाल्याकी लातूर जिल्ह्यातील पूर हा निसर्गनिर्मित नसून मानवनिर्मित आहे. सरकार आणि प्रशासन यांच्या ढिसाळ कारभाराचे हे एक उत्तम उदाहरण आहे.सरकार आणि प्रशासन झालेल्या दुर्लक्षामुळे शेतकऱ्यांना या पुराला सामोरे जाऊन हाताला आलेले पीक घालवावे लागले. मांजरा धरणाचे सुरुवातीला उघडलेले दरवाचे वेळेवर बंद केले असते तर हा पूर आला नसता, NDRF ची टिम जिथे पाठवायची गरज नव्हती तिथे पाठवल गेल आणि त्या अनुषंगाने लोकांच्या तोंडाला पान पुसण्याचे काम करण्यात आले म्हणून आम्ही या निष्काळजीपणाचा जाहीर निषेध करतोत . पालकमंत्री अमित देशमुख यांनी जलसंपदा विभागाला मागवलेला अहवाल निषेधार्ह असून 27, 28, 29, 30 तारखेला यांना याविषयाकडे लक्ष का द्यावे वाटले नाही ? हा प्रश्नही प्रेरणा होनराव यांनी उपस्तित केला आहे .

Recent Posts