लातूर जिल्हा

ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करून आमदार अभिमन्यू पवार यांनी ज्येष्ठ नागरिक दिन केला साजरा.

महाराष्ट्र खाकी (औसा) – औशाचे कर्तव्यदक्ष आमदार अभिमन्यू पवार हे मतदार संघात कोणतेचे विकास कार्य करतेवेळी नागरिकांना केंद्रबिंदू मानून कार्य करत असतात. मतदारसंघातील प्रत्येक वेक्तीला न्याय मिळावा, मान सन्मान मिळावा यासाठी ते नागरिकांच्या भेटीगाठी घेत असतात. आज आंतरराष्ट्रीय ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त उंबडगा बु. येथे आयोजित सर्व रोगनिदान तपासणी शिबीरास व खुंटेगाव येथे आणि हासेगाव येथे ज्येष्ठ नागरिकांसाठी आयोजित मोफत आरोग्य तपासणी, उपचार व समुपदेशन शिबिराचे आमदार अभिमन्यू पवार यांनी उद्घाटन केले. यावेळी उपस्थित ज्येष्ठ नागरिकांशी संवाद साधून त्यांना शुभेच्छा दिल्या व त्यांचे आशीर्वाद घेतले. “काळ वेगाने बदलतो आहे पण बदलत्या काळातही आपण आपली मूल्ये, संत महात्म्यांनी दिलेली शिकवण जपली पाहिजे. आई वडिलांचा सन्मानाने सांभाळ करणं हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे ज्येष्ठ नागरिक म्हणजे आपल्या रुढी परंपरांचे चालते बोलते विद्यापीठ असतात.त्यांच्याकडून जास्तीत जास्त शिकणं आणि त्यांच्या आयुष्यातील संध्याकाळ सुखकर बनवणं हे आपलं कर्तव्य आहे असे मनोगत यावेळी व्यक्त करुन हासेगाव आरोग्य केंद्रासाठी लवकरच एक रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्याचा शब्द दिला. यावेळी जिल्हा प्रभारी संतोष मुक्ता, तालुका आरोग्य अधिकारी डॉ आर आर शेख, वैद्यकीय अधिकारी डॉ हिंडोळे, डॉ बेलापट्टे, डॉ जोगदंड मॅडम, पटवारी, भागवत कांबळे, मोहीत भोसले, बाळुअप्पा, बावगे, लिंबराज थोरमोटे, श्रीराम माने, संग्राम मुक्ता, कल्पनाताई कांबळे, संतोष मेंदगे, शांतेश्वर मुक्ता, जैनोद्दीन पठाण, धर्मराज कोरे, श्रीमती गिरी, श्रीमती गायकवाड, मदने, माने, आरोग्य कर्मचारी, आशा कार्यकर्ते व ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते.

Most Popular

To Top