पोलीस

लातूर SP यांचे विशेष पथक, LCB ,औराद शहाजानी,लातूर ग्रामीण आणि गातेगाव पोलीस स्टेशनची अवैध धंद्यावर कारवाई.

महाराष्ट्र खाकी (लातूर) – लातूर पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी लातूर जिल्ह्यात अवैध धंद्याविरुद्ध कडक कारवाई करण्याचा सपाटाच लावला आहे. अशाच कारवाईचा भाग म्हणून उपविभागीय पोलिस अधिकारी (लातूर ग्रामीण) प्रिया पाटील मॅडम यांचे मार्गदर्शनात व स्थानिक गुन्हे शाखेचे(LCB) पोलीस निरीक्षक गजानन भातलवंडे यांचे नेतृत्वात लातूर जिल्ह्यामधील अवैध धंद्याविरूद्ध कारवाई करण्याचे अनुषंगाने अधिकारी व अंमलदार यांचे स्वतंत्र पथक तयार करून विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहीमे अंतर्गत पथकातील पोलीस अधिकारी/अंमलदार यांना वेळोवेळी सूचना व मार्गदर्शन करण्यात आले होते. या पथकाने जिल्ह्यामधील अवैध धंद्यावर कारवाई करीत असताना पथकास गोपनीय माहिती मिळाली की,औराद पोलीस स्टेशन हद्दीतील तांबळवाडी शिवारात एका ठिकाणी छापा मारला आणि 1)सर्फराज ताजोदीन सय्यद,वय- 39 वर्ष, राहणार- तांबाळा तालुका निलंगा. 2)सय्यद हुसेन दाऊद सय्यद, वय- 31 वर्ष, राहणार-तांबळवाडी,तालुका निलंगा. 3)कालिदास नरसिंग बिराजदार, वय-48, राहणार-औराद, तालुका निलंगा. असे स्वतःच्या फायद्यासाठी लोकांकडून पैसे घेऊन मटका जुगार खेळत व खेळवीत असताना सापडले त्यांच्याकडून जुगाराचे साहित्य,रोख रक्कम व मोटारसायकल असा एकूण 1 लाख 72 हजार 450 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. नमूद आरोपी विरोधात पोलीस ठाणे औराद शहाजानी येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक 186/2021, कलम 12 मुंबई जुगार कायदा प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात असून आला आहे. तसेच पोलीस स्टेशन औराद हद्दीतच औराद ते बसवकल्याण जाणारे रोडवर तांबरवाडी शिवारातच आणखीन एक जुगार अड्ड्यावर पथकाने छापा मारला आणि 1)अभंग माणिक जमादार, वय 38, वर्षे राहणार, बसवकल्याण तालुका जिल्हा बिदर. 2)इमरान इस्माईल सय्यद,वय 24 वर्ष , राहणार- तांबळवाडी तालुका निलंगा. 3)(बुकी) कालिदास नरसिंग बिराजदार, वय 48, राहणार- औराद तालुका निलंगा. हे लोकाकडून पैसे घेऊन कल्याण, मिलन-डे नावाचा मटका जुगार खेळत व खेळवीत असताना मिळून आल्याने यांच्या विरोधात औराद शहाजानी पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक 187/2021, कलम 12 मुंबई जुगार कायदा प्रमाणे गुन्हा दाखल करून त्यांच्याकडून जुगाराचे साहित्य व रोख रक्कम असा एकूण 32 हजार 370 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. दोन्ही गुन्ह्याचा तपास आणि पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी व अंमलदार करत आहेत.

गातेगाव पोलीस स्टेशनची कारवाई

गोपनीय माहिती च्या आधारे गातेगाव पोलीस स्टेशन येथील पोलिस अधिकारी व अमलदार यांनी लातूर ते बार्शी जाणारे रोडवर मुरुड-अकोला शिवारात गावठी हातभट्टीची टाटा इंडिका विस्टा गाडी मधून वाहतूक करीत असताना आरोपी 1) यशवंत लालसिंग राठोड,वय-30, वर्ष राहणार-तावरजखेडा जिल्हा उस्मानाबाद. 2)अच्युत सुभाष राठोड, वय- 27,वर्ष राहणार-आरनी,जिल्हा उस्मानाबाद 3) राजेभाऊ अनिल आडे, वय 20 वर्ष, राहणार- जवळगावतांडा, तालुका अंबाजोगाई जिल्हा बीड असे मिळून आले. त्यांच्याकडून 2 रबरी ट्यूब मधून 90 लिटर हातभट्टी बेकायदेशीररित्या विक्री व्यवसाय करण्याच्या उद्देशाने बाळगून व टाटा इंडिका विस्टा कंपनीची कार मधून वाहतूक करीत असताना मिळून एकूण आल्याने त्यांचे विरोधात पोलीस ठाणे गातेगाव येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक 141/2021 कलम 65 (अ) (ई) 81, 84 मुंबई दारूबंदी अधिनियम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्यांचा अधिक तपास पोलीस अमलदार राजगीरवाड हे करीत आहेत.

लातूर ग्रामीण पोलिसांची कारवाई

लातूर ग्रामीण पोलीस स्टेशन येथे उमरगा ते सोनवती जाणारे रोडवर मौजे सारोळा शिवारात 1) धर्मपाल चंद्रकांत अर्जून,वय- 38 वर्षे ,राहणार- सुगाव तालुका चाकूर जि.लातूर हा त्याच्या स्कुटी गाडीवरून देशी व विदेशी दारूचा मुद्देमाल वीनापास परवाना अवैध विक्री व्यवसाय करण्याकरिता वाहतूक करीत असताना देशी विदेशी दारू व गाडीसह एकूण 76,950/- रुपयाचे मुद्देमालासह मिळून आला त्यावरून नमूद आरोपीच्या विरोधात पोलीस ठाणे लातूर ग्रामीण येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक 230/2021 कलम 65 (अ)(ई) मुंबई दारूबंदी कायदा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस ठाणे लातूर ग्रामीण येथील पोलीस अमलदार देवके करीत आहे.

Most Popular

To Top