महाराष्ट्र

आमदार अभिमन्यू पवार यांनी औशात OBC राजकीय आरक्षणासाठी केले आंदोलन

महाराष्ट्र खाकी (औसा) – महाराष्ट्रात सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ओबीसी(OBC) प्रवर्गाचे आरक्षण रद्द झाल्याने आज महाराष्ट्रभर (BJP) भाजपच्या वतीने आंदोलन करण्यात आले .लातूर जिल्ह्यातही भाजप(BJP) कडून आंदोलन करण्यात आले लातूर जिल्ह्यात औसा, निलंगा, चाकूर, उदगीर, अहमदपूर, रेणापूर, देवणी यासह अन्य ठिकाणी आंदोलन करण्यात आले.औसा मतदार संघात आमदार अभिमन्यू पवार यांनी मराठा आरक्षणानंतर ओबीसी(OBC) आरक्षणाची हत्या करणाऱ्या आघाडी सरकारविरोधात औसा येथे आंदोलन करुन सरकारच्या कार्यपद्धतीचा निषेध केला.

आघाडी सरकारने मराठा आरक्षणानंतर ओबीसी(OBC) प्रवर्गाचे राजकीय आरक्षण सुद्धा घालवले आहे. ओबीसी(OBC) आरक्षणासाठी सर्वोच्च न्यायालयाने मागितलेला इंपेरिकल डेटा अगोदर उपलब्ध करून दिला नाही आणि सर्वोच्च न्यायालयाने आरक्षण रद्द केल्यानंतर ते पूर्ववत करण्यासाठी आयोग गठित करुन इंपेरिकल डेटा गोळा करण्यात कुचराई केली.OBC-reservation-BJP’s-agitation-in-various-places-in-Latur) आता पुन्हा न्यायालयाने आरक्षणामुळे निवडणुका पुढे ढकलता येणार नसल्याचा निकाल दिल्याने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पोटनिवडणुका आरक्षणाविना पार पडण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा समाजानंतर ओबीसी (OBC)प्रवर्गाचे सुद्धा हक्काचे आरक्षण गेले आहे. सरकार केवळ वसुली करण्यात व्यस्त राहिल्यानेच सामाजिक प्रश्न निर्माण झाले आहेत असे मत आज औसा येथे नाकर्त्या आघाडी सरकारविरोधात आंदोलन करुन सरकारच्या निष्क्रिय कार्यपद्धतीचा आमदार अभिमन्यू पवार यांनी प्रखर निषेध नोंदवला.

Most Popular

To Top