महाराष्ट्र

लातूर शहर प्रदूषण मुक्त ठेवण्यासाठी मदत होणाऱ्या रिअल टाइम प्रदूषण निर्देशांक प्रणालीचे महापौर विक्रांत गोजमगुंडे यांच्या हस्ते भूमिपूजन

महाराष्ट्र खाकी (लातूर) – लातूर शहरातील नागरिक प्रदूषण मुक्त वातावरणात आणि शहरात राहावे यासाठी महापौर विक्रांत गोजमगुंडे यांच्या हस्ते रिअल टाइम प्रदूषण निर्देशांक प्रणालीचे भूमिपूजन करण्यात आले. हवेतील शुद्धता कायम राखण्यासाठी पर्यावरण विभागाच्या वतीने काही नियम ठरवून दिले
आहेत. मात्र, या नियमाला केराची टोपली दाखविणाऱ्या शहरांमध्ये दिल्ली राजधानी प्रथम क्रमांकावर आहे. दिल्ली हे सर्वात प्रदूषित शहर आहे, तर महाराष्ट्रातील चंद्रपूर, पुणे, अकोला, अमरावती,औरंगाबाद, लातूर
बदलापूर, जळगाव, जालना, कोल्हापूर, मुंबई,
नवी मुंबई , नाशिक, नागपूर, सांगली, सोलापूर, ठाणे,
उल्हासनगर या 18 शहरांचा समावेश आहे. यातील लातूर शहराचे महापौर विक्रांत गोजमगुंडे यांच्या दूरदृष्टीतून आणि शहरासाठी सतत नव नवीन योजना राबवत असतात याचाच एक भाग म्हणून लातूर शहराची प्रदूषणातील परिस्थिती आणखीन बिकट होऊ नये म्हणून


लातूर शहरातील हवामान बदल आणि वाढत्या प्रदूषणावर मनपाच्या माध्यमातून योग्य ती पाऊले उचलण्यात येत आहेत. शहरातील लोकनेते विलासरावजी देशमुख पार्क येथे 24 तास रिअल टाइम वातावरण हवा देखरेख प्रणाली लवकरच स्थापित केली जाणार आहे. या प्रणालीचे भूमिपूजन महापौर विक्रांत गोजमगुंडे यांच्या हस्ते संपन्न झाले. या प्रणालीद्वारे प्रदूषित हवेतील शरीरास हानिकारक वायू, श्वसनास घातक असे धुळीचे प्रमाण, सल्फर डाईऑक्साइड, कार्बन डाईऑक्साइड इत्यादी शरीरास हानिकारक असलेल्या वायूचे मोजमाप 24 तास चालू राहणार . मनपा मुख्यालय समोरील बाजूस उभारण्यात येणाऱ्या LED बोर्ड वर ही माहिती नागरिकांना देखील बघता येणार आहे. तसेच हवेचे मोजमाप करून शहराला वायुप्रदूषण मुक्त करण्यासाठी मनपाला उपाययोजना कृती आराखडा तयार करण्यास मदत होणार आहे. आणि प्रदूषित शहराच्या यादीतून लातूर शहर बाहेर पडण्यास मदत होईल. या प्रणालीच्या माध्यमातून महापौर विक्रांत गोजमगुंडे यांची विकासाबाबदची दूरदृष्टी आणि लोकसेवेची तळमळ दिसून येते. विक्रांत गोजमगुंडे यांच्या कामाचे नागरिक कौतुक करत आहेत. यावेळी महाराष्ट्र प्रदूषण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी जयंत कदम, क्षेत्र अधिकारी क्षीरसागर, मनपा उपायुक्त मयुरा शिंदेकर, सहाय्यक आयुक्त मंजुषा गुरमे, रमाकांत पिडगे, मनपा पर्यावरण सल्लागार राहुल बोबे आदी उपस्थित होते.

Most Popular

To Top