महाराष्ट्र

कोरोना काळातील मृत्यूंच्या आकडयांचा खूलासा करा आणि कोरोनाग्रस्थ झालेल्या व महात्मा ज्योतीबा फुले या योजनेपासुन वंचीत असलेल्या गोरगरीब रुग्णांना तात्काळ मोबदला मिळावा – प्रेरणा होनराव

महाराष्ट्र खाकी (लातूर) – लातूर भाजपाला मॅनेज होण्याचे आरोप कार्यकर्त्यामुळे आणि नेत्यांमुळे लागले आहेत .पण असे काही नेते मंडळी आहेत ज्यांनी फक्त आणि फक्त पक्षाच्या विचाराशी आणि लोकसेवेत थोडीसुद्धा कुचराई केली नाही ते एकदम एकनिष्ठ आणि लोकसेवेसाठी सदैव तत्पर असतात त्यातील एक आहेत प्रेरणा होनराव त्या सदैव अन्याय विरुद्ध आवाज उठवत असतात आणि लोकांना न्याय देण्याचा प्रयत्न करत असतात. लातूर शहर आणि जिल्ह्यातील नागरिकांना सरकार कडून आणि प्रशासनाकडून मिळाल्या नाहीत म्हणून प्रेरणा होनराव यांनी गुरुनाथ मगे आणि नागरिकांसोबत जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी यांच्या मार्फत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, लातूरचे पालकमंत्री अमित देशमुख आणि लातूरचे माजी पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांना निवेदन दिले. कोरोना कालखंडामध्ये त्रास झालेल्या लातूर जिल्हयातील व लातूर शहरातील नागरिकांच्या समस्या सर्वांनाच माहीत आहेत,तरीही त्यातील 2 विशेष समस्यावर प्रेरणा होनराव भाजपच्या प्रदेश सचिव भाजप युवा मोर्च्या यांनी लातूरकरांच्या समोर आणले आहे. कोरोना कालखंडामध्ये सरकारने दाखविलेली मृत्यूची संख्या व प्रत्यक्ष दवाखाण्यामध्ये झालेल्या मृत्यूचे आकडे यामध्ये प्रचंड तफावत दिसुन येत आहे. सरकारने व प्रशासनाने तात्काळ योग्य त्या आकडेवारी जनतेसमोर सादर करावी आणि कोराना बाधीतांची लपविलेली संख्या ही देखील जनतेसमोर तात्काळ जाहीर करावी अशी मागणी प्रेरणा होनराव यांनी केली आहे. आणि कोरोना कालखंडामध्ये कोरोना बाधिताचे आकडे लपविण्यात आले व सरकारने मे 2020 मध्ये काढलेल्या ७२ नुसार जिल्हा संनियंत्रण समितीने लातूर शहर व जिल्हयामध्ये गोर गरिब कोरोना बाधितांना महात्मा ज्योतिबा फुले योजनेअंतर्गत आर्थिक सहाय्य मिळावे यासाठी कुठलीही मदत केली नाही व खाजगी दवाखाण्यांना याचा प्रत्यक्ष लाभ झाला असे प्रकर्षाने निदर्शास आले आहे. बहुतांशी दवाखाण्यांनी 100 पैकी फक्त 3 लोकांना या योजनेचा लाभ दिलेला आहे. गोर गरिब जनतेला स्वत:चे घर विकून, मालमत्ता विकून उपचार करुन घ्यावा लागला. तरी 27 मे 2021 च्या महाराष्ट्र शासनाच्या 92 नुसार ज्या कोरोना बाधितांनी दवाखाण्याचे बिल, रेशन कार्ड जमा करुन तक्रार दिली आहे त्या सर्वांना महात्मा ज्योतीबा फुले या योजनेअंतर्गत तात्काळ मदत झाली पाहिजे अशी विनंती पूर्वक मागणी प्रेरणा होनराव यांनी केली आहे आणि असे न झाल्यास त्यांना मदत मिळेपर्यंत तिव्र आंदोलनाचा इशारा हि दिला आहे.

Most Popular

To Top