महाराष्ट्र खाकी (लातूर ) – लातूर जिल्ह्यात 23 पोलीस स्टेशन आहेत आणि वेगवेगळी पथके देखील आहेत. लातूर जिल्ह्यातील विशेषतः लातूर शहरातील गुन्हेगारी कमी करण्याचे आणि गुन्हेगारांना पकडण्यात आणि गुन्ह्याचा तपास करण्यात लातूर LCB अग्रेसर दिसून येत आहे. याचे सारे श्रेय पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे आणि अपर पोलीस अधीक्षक हिम्मत जाधव यांना जाते, विशेष करून LCB पोलीस निरीक्षक गजानन भातलवंडे यांच्या नेतृत्वात LCB टिम च्या काम करण्याची पद्धतीचे कौतुक सध्या जिल्ह्यातील नागरिक करत आहेत .कारण जिल्ह्यातील गुन्हेगारीला आळा घालण्याचे काम गजानन भातलवंडे यांच्या नेतृत्वात होत आहे. अशाच प्रकारे LCB ने रेणापूर येथील डिझेल चोरी प्रकरणाचा आरोपी पकडून खुलासा केला आहे.काही दिवसापूर्वी रेनापुर येथील एका पेट्रोल पंपावर डिझेल चोरीचा प्रकार घडला होता. त्यावरून रेणापूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद करण्यात आला होता FIR. NO.355/2021, कलम 379 भादवी प्रमाणे गुन्ह्याचा समांतर तपास LCB चे पोलिस अधिकारी व अंमलदार करीत होते. दरम्यान तपास पथकाला माहिती मिळाली की, रेणापूर येथील डिझेल चोरीच्या गुन्ह्यातील आरोपी मुरुड येथे ट्रक NO. MH.44-7787 मध्ये बसून येणार आहेत. अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने सदर तपास पथकाने सबस्टेशन मुरुड येथे सापळा लावला. माहिती प्रमाणे एक ट्रक समोरून येताना दिसला. सदर ट्रकला हात करून थांबून ट्रक चालकास विश्वासात घेऊन त्याच्याकडे नमूद गुन्ह्याबाबत विचारपूस केली असता त्याने आपले नाव राजेंद्र काळे, वय 21 वर्ष, राहणार-आंदोरा तालुका कळंब, जिल्हा उस्मानाबाद ह.मु. कनेरवाडी, तालुका कळंब जिल्हा उस्मानाबाद असल्याचे सांगितले तसेच रेनापुर येथील डिझेल चोरीच्या गुन्ह्यांमध्ये सध्या त्याच्या ताब्यातील ट्रक व अजून एक ट्रक वापरून इतर साथीदाराच्या मदतीने सदरचा गुन्हा केल्याचे कबूली दिली . गुन्ह्यात चोरलेले डिझेल याच ट्रक मध्ये पाठीमागे प्लास्टिकच्या कॅन मध्ये भरून ठेवलेले आहे असे सांगितले.
त्यावरून आरोपी राजेंद्र काळे यास गुन्ह्यात अटक करून त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेला ट्रक व 385 लिटर डिझेल असा एकूण 10 लाख 36 हजार 960 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक श्री निखिल पिंगळे, पोलीस अधीक्षक श्री.हिंमत जाधव, उपविभागीय पोलिस अधिकारी (ग्रह) श्रीमती प्रिया पाटील यांचे मार्गदर्शनात व LCB पोलीस निरीक्षक श्री.गजानन भातलवंडे यांचे नेतृत्वात सपोनि सुधीर सूर्यवंशी पोलीस अंमलदार राजेंद्र टेकाळे,अंगद कोतवाड,राम गवारे, प्रकाश भोसले, राम हरी भोसले,राजू मस्के,नवनाथ हसबे,नितीन कठारे,चालक पोलीस अमलदार प्रदीप चोपणे यांचा सहभाग होता.
LCB पोलीस निरीक्षक गजानन भातलवंडे यांच्या नेतृत्वात 10 लाख 36 हजार रुपयांचा मुद्देमालासह डिझेल चोरीच्या प्रकरणात आरोपीला अटक
- Maharashtra Khaki
- August 17, 2021
- 1:47 pm
Recent Posts
क्रेडिट कार्डवर घेतलेल्या कर्जाची परतफेड न केल्याने बँकेच्या तगाद्याला कंटाळून निलंग्यातील तरुणाने संपवले जीवन
January 9, 2025
No Comments
Latur Jilha जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर – घुगे यांनी घेतला तंबाखू नियंत्रण समितीच्या कामाचा आढावा
January 7, 2025
No Comments
भारतीय किसान युनियनचे मराठवाडा प्रभारी मा. नेहरू देशमुख यांनी काळ्या आईची पूजा करून साजरी केली वेळ अमावस्या
December 31, 2024
No Comments