लातूर LCB कडून जिल्ह्यातील वेगवेगळ्या पोलीस स्टेशन मधील सात गुन्हे उघडकीस आणून 12 लाख 52 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत

महाराष्ट्र खाकी (लातूर) – लातूर जिल्ह्यातील गुन्हेगारीचे प्रमाण कमी करण्यात लातूर LCB पोलीस निरीक्षक गजानन भातलवंडे यांची पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे आणि अपर पोलीस अधीक्षक हिम्मत जाधव यांच्या मार्गदर्शनात धडाकेबाज कारवाई केली आहे .लातूर LCB पोलीस निरीक्षक गजानन भातलवंडे यांच्या सतत होणाऱ्या कारवाईमुळे नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.लातूर जिल्ह्यातील विविध पोलिस स्टेशन व नांदेड जिल्ह्यातील लोहा पोलीस स्टेशन मधील गुन्हे उघडकीस आले आहेत गुन्ह्यामध्ये चोरलेला एकूण 12.5 लाख रुपये  किमतीचा मुद्देमाल सर्व आरोपी कडून जप्त करण्यात आला आहे त्यांना अटक करण्यात आली आहे. आरोपी अक्षय राम तेलंगे ,वय 19 वर्ष ,राहणार ब्राह्मण गल्ली , औसा आणि साहिल मेहबूब सय्यद, वय 21 वर्ष, राहणार संजय नगर ,औसा यांनी पोलीस ठाणे विवेकानंद चौक आणि औसा येथील गुन्हे केल्याचे कबूली दिली . आणि आरोपी मधुकर आबा काळे, वय 26 वर्ष, राहणार खामकरवाडी, तालुका वाशी जिल्हा उस्मानाबाद, भैया आबा काळे ,वय 22 वर्ष ,राहणार खामकरवाडी, तालुका वाशी जिल्हा उस्मानाबाद, रमेश सर्जेराव पवार, वय 26 वर्ष, राहणार-खामकरवाडी , तालुका वाशी जिल्हा उस्मानाबाद यांनी  MIDC पोलीस स्टेशन  आणि मुरुड पोलीस स्टेशन येथील गुन्हे केलेले आहेत तर आरोपी दिलीप शिवराम गायकवाड, वय-26, वर्ष राहणार सायाळ रोड ,लोहा. जिल्हा नांदेड, ह.मु. औसा रोड लातूर याने लोहा पोलीस स्टेशन जिल्हा नांदेड येथील गुन्हा केलेला असून त्या या सर्व गुन्ह्यामधील एकूण 1252000 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
  गुन्ह्यात जप्त केलेल्या मुद्देमालाची  पोलीस स्टेशन निहाय माहिती खालील प्रमाणे.

1) विवेकानंद चौक पोलीस स्टेशन, मोटर सायकल 15000 /- जप्त आणि मोटर सायकल 35000/- जप्त

2) औसा पोलीस स्टेशन, मोटरसायकल व मोबाईल 55000 रुपयांचा मुद्देमाल जप्त .

3)  MIDC पोलीस स्टेशन, ट्रक, टायर असा मिळून एकूण 10,45,000/- रुपयांचा मुद्देमाल जप्त .

4) मुरुड पोलीस स्टेशन, पेट्रोल डिझेल चोरण्याचे साहित्य कॅन पाईप हातपंप 2000 रुपये.

5) लोहा पोलीस स्टेशन,जिल्हा नांदेड मोटार सायकल 1,00,000/- जप्त .

ही सर्व कारवाई सहायक पोलीस निरीक्षक सुधीर सूर्यवंशी,  पोलीस उपनिरीक्षक लक्ष्मण कोमवाड, पोलीस अंमलदार राजेंद्र टेकाळे, संजय भोसले ,राम हरी भोसले, प्रकाश भोसले, राजेभाऊ मस्के, हसबे ,राजेभाऊ सूर्यवंशी ,नामदेव पाटील, बंटी गायकवाड, भीष्मानंद साखरे, प्रमोद  तरडे हारुण लोहार, चालक अंमलदार लांडगे यांनी बजावली सर्व गुन्ह्यांचा पुढील तपास संबंधित पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी आणि अंमलदार करीत आहेत.

Recent Posts