देश

लातूर पोलीस दलातील API राहुल बहुरे यांना केंद्रीय गृह मंत्रालयातर्फे “युनिक होम मिनिस्ट्री” पदक जाहीर, महाराष्ट्रातील 11 अधिकाऱ्यांचा समावेश

महाराष्ट्र खाकी (लातूर) – समाजात कायदा सुवेवस्था सुरळीत राहण्यासाठी पोलीस काम करत असते. समाजात वेगवेगळ्या क्षेत्रात गुन्हे घडत असतात, गुन्ह्याचा उत्कृष्ट तपास करणाऱ्या देशभरातल्या 152 पोलीस कर्मचारी-अधिकाऱ्यांना केंद्रीय गृह मंत्रालयातर्फे “युनिक होम मिनिस्ट्री” पदक जाहीर करण्यात आलं आहे. त्यामध्ये महाराष्ट्रातील 11 अधिकाऱ्यांचा समावेश आहे त्यात चार महिला अधिकारीही आहेत. या 11 अधिकाऱ्यांमध्ये लातूर पोलीस दलातील औसा पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक राहुल धलसिंग बहुरे आहेत लातूर पोलिसांसाठी आणि लातूरकरांसाठी ही अभिमानाची गोष्ट आहे . सहायक पोलीस निरीक्षक राहुल धलसिंग बहुरे यांचे लातूर पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी अभिनंदन आणि कौतुक केले आहे.पोलिसांमध्ये तपास कार्याबद्दल उच्च व्यावसायिक दृष्टीकोन निर्माण व्हावा तसेच उत्तम तपास कार्य करणाऱ्या पोलिसांच्या कामाची दखल घेतली जावी, या उद्देशाने 2018 मध्ये केंद्र सरकारने “युनिक होम मिनिस्ट्री” पुरस्कार सुरू केला . हे पारितोषिके आणि पदके मिळवणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाच्या एकूण 15 पोलिसांचा समावेश आहे. तसेच महाराष्ट्र पोलीस दलातील 11, गोवा पोलिस दलातील 1 आणि गुजरातच्या पोलीस दलातील 6, मध्य प्रदेशातील 11, उत्तर प्रदेशातील 10, केरळ आणि राजस्थानातील प्रत्येकी 9, तामिळनाडू पोलीस दलातील 8, बिहार पोलीस दलातील 7, कर्नाटक आणि दिल्ली पोलीस दलातील प्रत्येकी 6 आणि इतर राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांतील पदक मिळालेल्या पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश आहे. यामध्ये 28 महिला पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश आहे हे विशेष आणि अभिमानाची गोष्ट आहे .

“युनिक होम मिनिस्ट्री” पारितोषिक ( मेडल ) मिळालेले महाराष्ट्रातील पोलीस अधिकारी

1) राहुल धलसिंग बहूरे, सहायक पोलिस निरीक्षक
2) पद्मजा अमोल बधे, सहायक पोलिस आयुक्त
3) अलका धीरज जाधव, सहायक पोलिस निरीक्षक
4) अजित राजाराम टिके, उपअधीक्षक
5) ममता लॉरेन्स डिसोझा, पोलिस निरीक्षक
6) मनोहर नरसप्पा पाटील, पोलिस निरीक्षक
7) बाबूराव भाऊसो महामुनी, उपअधीक्षक
8) प्रिती प्रकाश टिपरे, सहायक पोलिस आयुक्त
9) सुनिल शंकर शिंदे, पोलिस निरीक्षक
10) सुनिल देवीदास कडासने, पोलिस अधीक्षक
11) उमेश शंकर माने पाटील, उपअधीक्षक

Most Popular

To Top