महाराष्ट्र खाकी (लातूर) – या वर्षी पावसामुळे राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी जिवीत हानी, शेतीचे नुकसान बऱ्याच जाणाचे संसार गेले, राज्य आणि केंद्र सरकार मदत करत आहे. तरी पण महाराष्ट्रात भाजपा कडून सर्व नेते आणि पधादिकारी सामान्य माणसाला मदत, न्याय आणि मानसिक आधार देण्याचे काम करत आहेत. अशीच एक घटना 22 जुलै रोजी लातूर शहरातील दयानंद महाविद्यालय शेजारील परिसरात एका ऑटो वर झाड पडून चालक मारोती काळे यांचा मृत्यू झाल्याची दुःखद घटना घडली होती. या घटनेची गंभीर दाखल घेत कुटुंबाची भेट घेऊन सांत्वन केले आणि मानसिक आधार भाजयुमो महाराष्ट्र सचिव प्रेरणा होनराव यांनी दिला. काळे कुटुंबाला आर्थिक मदत मिळावी म्हणून प्रशासनाला निवेदन देऊन त्याचा पाठपुरावा केला आणि शेवटी जिल्हा नियोजन समितीने मारोती काळे यांच्या कुटुंबाला चार लाखाची मदत केली.
या घटनेने काळे परिवार खचून गेले होते पण प्रेरणा होनराव यांनी काळे परिवाराची भेट घेऊन त्यांना मानसिक आधार दिला आणि त्यानां मदत मिळवण्यासाठी प्रशासनाकडे पाठपुरावा केला. जसे राज्यात भाजपचे नेते पूरग्रस्थाची मदत करत आहे त्याच कर्तव्याचा आणि लोक सेवेचा वाटा समजून प्रेरणा होनराव यांच्या पाठपुराव्याला यश आले आणि काळे परिवाराला आर्थिक मदत मिळाली. लातूर मनपाचा भोंगळ कारभारामुळे शहरात अनेक समस्याना लोक सामना करत आहेत. या कारभारावर प्रेरणा होनराव यांनी वेळोवेळी पुढाकार घेऊन मनपा प्रशासनाला जागे करण्याचे काम केले आहे.