झाड पडून मृत्यू झालेल्या ऑटो चालक मारोती काळे यांच्या परिवाराला अमित देशमुख यांच्या हस्ते 4 लाख रुपयांची मदत

महाराष्ट्र खाकी (लातूर) – लातूर शहरातील दयानंद महाविद्यालय शेजारील परिसरात काही दिवसापूर्वी एका वर झाड पडून चालकाचा मृत्यू झाल्याची दुःखद घटना घडली होती. मागील काही दिवस लातूर जिल्ह्यात सतत पाऊस पडत होता, त्यामुळे की काय झाडाच्या मुळा कमकुवत झाल्यामुळे झाड पडले असावे अस मत उपमहापौर चंद्रकांत बिराजदार म्हणाले होते. या अपघातात ऑटो चालक मारोती काळे रा.चांडेश्वर यांचा मृत्यू झाला होता.मयत ऑटो चालक मारोती काळे यांच्या कुटुंबियांना पालकमंत्री अमित देशमुख यांच्या हस्ते 4 लाख रुपयांच्या आर्थिक मदत करण्यात आली आहे . यावेळी जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी, जिल्हा परिषद अभिनव गोयल, महानगरपालिका आयुक्त अमन मित्तल, महापौर विक्रांत गोजमगुंडे, महानगरपालिका विरोधी पक्षनेते दीपक सूळ उपस्तित होते.

जाहिरात
Recent Posts