उदगीर तालुक्यातील नागलगावात शेतीच्या वादातून गोळीबार,आठ दिवसात दुसरी मोठी घटना

महाराष्ट्र खाकी (उदगीर) – लातूर जिल्हा तसा शांत जिल्हा म्हणून ओळख आहे पण मागील तिन – चार दिवसात लातूर जिल्हा चांगलाच चर्चेत आहे कारण लातूर जिल्ह्यातील उदगीर तालुक्यातील दोन घटनानीं जिल्हा हदरून गेला आहे कारण दोन दिवसा खाली उदगीर शहरात एका तरुणाने माझ्याकडे का बघतोस म्हणून चाकूने वार केले जखमी तरुण उपचारा दरम्यान मृत्यू झाला. या घटना शांत होत नाही तोपर्यंत आज 5 वाजण्याच्या दरम्यान उदगीर तालुक्यातील नागलगावात शेतीच्या वादातून सेवानिवृत्त शिवाजी ज्ञानबा पाटील यांनी आपल्या जवळील असलेल्या बंदूकीतून रमाकांत गणपत गुडसुरे यांच्यावर गोळीबार केला यात रमाकांत गणपत गुडसुरे हे जखमी झाले आहेत रमाकांत यांना सामान्य जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे. पोलीस पुढील कारवाई करत आहेत.

Recent Posts