महाराष्ट्र खाकी (मुंबई) – आसाम आणि मिझोरम राज्यांमधील सीमासंघर्षातून आसामच्या कचार जिल्ह्यात उडालेल्या चकमकीत जखमी झालेले मूळचे महाराष्ट्रातील आयपीएस अधिकारी IPS वैभव निंबाळकर यांना एयरलिफ्ट करून उपचारासाठी मुंबईत आणण्यात आले आहे.IPS वैभव निंबाळकर यांच्या पायाला गोळी लागली. त्यांच्या प्रकृती स्वास्थ्यासाठी तातडीने योग्य ते सर्व सहकार्य करण्याच्या सूचना राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी पोलिस प्रशासनाला दिल्या आहेत. देशातील आसाम आणि मिझोराम राज्यात सीमा वाद सुरू आहे. तसा अनेक राज्यात सीमा वाद सुरू असतो, महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातील सीमा वाद आपणास परिचित आहेच. परंतु आसाम आणि मिझोराम राज्याच्या पोलीस दलात गोळीबार घडला, यात आसामचे 5 पोलीस जवान शहीद झाले. महाराष्ट्राचे सुपुत्र पोलीस अधीक्षक IPS वैभव निंबाळकर यांनाही पायात गोळी लागली मूळचे पुणे येथील असणारे वैभव निंबाळकर हे IPS अधिकारी आहेत. सैन्य आणि पोलीस दल नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी शत्रूंशी लढत असतात परंतु आपल्याच देशातील राज्याची सीमेच्या रक्षणार्थ शेजारील राज्याकडून पोलीस जवान शहीद होण्याची कदाचित अशी पहिलीच घटना असावी.
