वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी तळीये दुर्घटनेतील जखमींची J. J हॉस्पिटल मध्ये भेट घेऊन प्रकृतीची विचारपूस केली

महाराष्ट्र खाकी (मुंबई) – गेल्या आठवड्याभरापासून महाडमध्ये पाऊस सुरू आहे. गुरुवारी दुपारी 4 वाजताच्या सुमारास महाडच्या तळीये गावात दरड कोसळण्याची दुर्घटना घडली. महाड तालुक्‍यातील तळीये गाव हे डोंगर कपारीमध्ये वसलेले आहे. या गावावर दरड कोसळल्याने दरडीखाली 35 घरे दबली गेली. दरड कोसळण्याची घटना घडताच स्थानिकांनी धाव घेऊन मदत कार्यास सुरुवात केली. स्थानिकांनी मातीच्या ढिगाऱ्याखालून सुरुवातीला 32 जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले होते. नंतर मृतांचा आकडा 40 वर पोहोचला. तर 80 ते 85 जण अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

मात्र पावसामुळे मदत कार्यास अडथळा निर्माण होत आहे. NDRF आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने या ठिकाणी बचाव कार्य सुरू करण्यात आलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तळीये गावाला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला या दुर्घटनेतील 16 जखमींवर J. J हॉस्पिटल मध्ये उपचार सुरू आहे. आज राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी जखमींची भेट घेऊन प्रकृतीची विचारपूस केली. जखमींच्या उपचाराचा सर्व खर्च राज्य शासन करणार असून अशा संकटात शासन आपल्या पाठीशी असल्याची ग्वाही अमित देशमुख यांनी यावेळी दिली.

जाहिरात
Recent Posts