महाराष्ट्र

अमित देशमुख सांस्कृतिक कार्यमंत्री यांनी सपत्नीक घेतली अभिनेत्री सायरा बानो यांची सांत्वनपर भेट

महाराष्ट्र खाकी ( मुंबई ) – अनेक दिवसांपासून दिलीप कुमार यांच्यावर उपचार सुरु होते. यापूर्वी 6 जून रोजी देखील दिलीप कुमार यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. श्वास घेण्यास त्रास होत असल्यामुळे मुंबईतील खारमधील हिंदूजा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर डिस्चार्ज देण्याच्या एक दिवस अगोदर एका मायनर सर्जरीमार्फत दिलीप कुमार यांच्या फुफ्फुसांत जमा झालेलं पाणी काढण्यात आलं होतं. 5 दिवस रुग्णालयात राहिल्यानंतर 11 जून रोजी दिलीप कुमार यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता. परंतु काही दिवसानंतर श्वास घेण्यास त्रास होत असल्यामुळे दिलीप कुमार यांना 29 जून रोजी मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांची प्रकती स्थिर असल्याची माहितीही समोर येत होती. परंतु, प्रकती अस्वास्थामुळे 7 जुलै रोजी दिलीप कुमार यांचं निधन झालं ते 98 वर्षांचे होते. मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

अनेक नेत्यांनी आणि अभिनेत्यांनी त्यांच्या घरी जावून श्रद्धांजली वाहिली आणि आता महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी अभिनेत्री सायरा बानो यांची आज सांत्वनपर भेट घेतली. या भेटीदरम्यान सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी दिवंगत ज्येष्ठ अभिनेते दिलीपकुमार यांना श्रद्धांजली वाहिली. यावेळी सांस्कृतिक कार्य मंत्री यांच्या पत्नी अदिती देशमुख उपस्थित होत्या.
एकापेक्षा एक र्जेदार चित्रपटांतून अभिनय करणाऱ्या दिलीपकुमार यांचे चित्रपट सृष्टीतील योगदान हे अनन्यसाधारण असून त्यांचा अभिनय सदैव स्मरणात राहील, अशा भावना व्यक्त करून सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी या भेटीदरम्यान व्यक्त केल्या.

Most Popular

To Top