महाराष्ट्र खाकी ( लातूर ) – लातूर जिल्ह्यात अनेक अभ्यासू राजकारणी झाले आणि आहेत. देशाच्या केंद्रीय मंत्रिमंडळ मध्ये काम करणारे लातूर जिल्ह्याचे सुपुत्र शिवराज पाटील चाकूरकर आणि स्व. विलासराव देशमुख होते. पण या दोघांची राजकीय कर्म भूमी हि लातूर जिल्हा होती पण डॉ. भागवत कराड यांची औरंगाबाद हि आहे, पण या तिघांमध्ये एक साम्य आहे ते म्हणजे हे तिघेही लातूरचे आहेत. शिवराज पाटील चाकूरकर आणि विलासराव देशमुख यांनी कुठल्याही विकास कामात लातूरला प्राधान्य दिले आहे. तसेच डॉ. भागवत कराड करतील का हा प्रश्न लातूरच्या जनतेच्या मनात निर्माण झाला असेल कारण स्व. विलासराव देशमुखानंतर लातूर जिल्ह्याला केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळाले आहे. डॉ. भागवत कराड हे अहमदपूर तालुक्यातील चिखली गावातील असून, त्यांनी औरंगाबाद येथील शासकीय वैद्यकीय महविद्यालयात वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले. शहरात वैद्यकीय व्यवसाय करत असताना 1996 ला त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर ते नगरसेवक म्हणून निवडून गेले. त्यानंतर त्यांनी औरंगाबाद शहराचे दोनवेळा महापौर, भाजप राज्य कार्यकारणीचे उपाध्यक्ष आणि दोन वर्षे मराठवाडा वैधानिक विकास महामंडळाचे अध्यक्ष या जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. मराठवाड्यात भाजप वाढविण्यात त्यांचा मोठा वाटा आहे.राज्यसभेचे खासदार डॉ. भागवत कराड यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रीमंडळात स्थान मिळाले आहे. त्यांना केंद्रात अर्थ राज्यमंत्री पद मिळाले आहे. शेतकरी पुत्र असलेल्या डॉ.भागवत कराड यांचा नगरसेवक ते केद्रात मंत्री असा राजकीय प्रवास झाला आहे. त्यांना मंत्रिपद देऊन भाजपने एकप्रकारे राज्यातील ओबीसींना मोदी सरकारमध्ये प्रतिनिधित्व दिले आहे.
डॉ. भागवत कराड यांची राजकीय कारकीर्द
1) भाजपकडून राज्यसभा सदस्य ( 2020 )
2) भाजपचे सभागृह नेते, औरंगाबाद महानगरपालिका (1999 – 2009)
3) औरंगाबाद महानगरपालिकेचे महापौर ( एप्रिल 2000 ते ऑक्टोबर 2001 आणि नोव्हेंबर 2006 ते ऑक्टोबर 2007 – 2 वेळा महापौर)
4) औरंगाबाद महानगरपालिकेचे उपमहापौर (1997 -1998)
5) स्थायी समिती सदस्य, औरंगाबाद महानगरपालिका
(1995 -1997)
6) औरंगाबाद महानगरपालिकेत नगरसेवक ( 1995 ते 2010 या काळात तीन वेळा )