लातूर जिल्हा

लातूर जिल्हा कारागृहात एका कैद्याने गळफास घेऊन आत्महत्या केली

महाराष्ट्र खाकी ( लातूर ) – जेल मध्ये अनेक प्रकारचे गुन्हेगार असतात. काही कठोर मनाचे तर काही भावनिक आणि घाबरट असतात. काही जणांना गुन्हा केल्यावर त्याचा पश्चताप होतो तर काहींना भीती वाटते की आपण यातून बाहेर पडूशकत नाही अशाच विचारातून काही गुन्हेगार जेल मध्ये आत्महत्या करता. अशीच एक घटना लातूर येथील जिल्हा कारागृहात घडली आहे.एका कैद्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना दि 10/07/2021 शनिवारी पहाटेच्या सुमारास घडली. निलंगा तालुक्‍यातील औराद शहाजानी पोलीस ठाण्यात त्याच्याविरोधात बाललैेंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात लातूरच्या जिल्हा कारागृहात असलेल्या बजरंग शेषेराव पवार वय 20, रा. जामगा ता. निलंगा बजरंग पवार हा मागील आठ दिवसांपासून आपल्या भावाशी जास्त काही बोलत नव्हता.

बजरंग पवार 15 जून पासून जेल मध्ये होता आपल्यावर दाखल असलेल्या पोस्कोअंतर्गत कलम 376 गुन्ह्यातून लवकर बाहेर पडणे आता शक्य नाही, असे त्याला सतत वाटत होते. यातूनच त्याच्यामध्ये नैराश्याची भावना निर्माण झाली असावी. आणि बजरंग पवार याने आपल्या जवळ असलेले टॉवेलने कारागृहाच्या शौचालयात गेल्यानंतर फाडले आणि त्यापासून दोरी तयार केला. आणि गळफास घेत आपले जीवन संपविली अशी माहिती लातूर कारागृह अधीक्षक राहुल झुटाळे यांनी सांगितले. या घटने बाबत MIDC पोलीस स्टेशन मध्ये नोंद करण्यात आली आहे.

Most Popular

To Top