अहमदपूर पोलिसांची अवैध दारूविक्री आणि जुगार अड्यावर कारवाई

महाराष्ट्र खाकी (अहमदपूर ) – लातूर जिल्ह्यात अवैधधंदे काही प्रमाणात कमी झाले आहे. शहरी आणि ग्रामीण भागात अवैधरीत्या दारूविक्री, जुगार अशा घटना होत आहेत. या कमी करण्यात लातूर जिल्हा पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे आणि अपर अधीक्षक हिम्मत जाधव यांच्या मार्गदर्शनात जिल्हा पोलीस उत्तम कार्य करत आहेत अशीच कारवाई अहमदपूर तालुक्‍यातील विळेगाव शिवारात अवैधरीत्या दारूविक्री होत असल्याची माहिती किनगाव पोलिसांना मिळाली. त्यावरून पोलिसांनी शुक्रवारी धाड टाकली. यात 3 हजार 840 रुपयांची दारू आढळून आली. या प्रकरणी तांबटसांगवी येथील आरोपीविरुद्ध पो.कॉ. नागनाथ कातळे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पो.हे.कॉ. मुरकुटे हे करीत आहेत. अहमदपूर तालुक्‍यातील खंडाळी येथील एका पत्र्याच्या शेडमध्ये मटका जुगार सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यावरून किनगाव पोलिसांनी शुक्रवारी धाड टाकली. या वेळी जुगाराच्या साहित्यासह रोख रक्‍कम असा एकूण 790 रुपयांचा मुहेमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी पो.हे.कॉ. रामचंद्र गोखरे यांच्या फिर्यादीवरून दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास ना.पो.कॉ. देवळे करीत आहेत.

Recent Posts