सोलापूर पोलिसातील API रोहन खंडागळे लाच स्वीकारताना ACB ने रंगेहाथ पकडले.

महाराष्ट्र खाकी ( सोलापूर ) – सरकारी नोकरदार असो वा पोलिस दलातील काही लोकांमुळे इमानदार अधिकारी बदनाम होत असतात असाच एक प्रकार सोलापूर मध्ये घडला आहे.सोलापुरातील सलगर वस्ती पोलीस ठाण्यात मुरूम चोरी प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास सहायक पोलीस निरीक्षक (API) रोहन खंडागळे यांच्याकडे होता. मात्र गुन्ह्यात जप्त करण्यात आलेले डंपर सोडण्यासाठी तसेच आरोपीला अटक न करण्यासाठी रोहन खंडागळे यांनी 10 लाख रुपयांची लाच मागितली. तडजोडी अंती साडेसात लाख रुपये द्यायचे ठरले. लाचेचे पैसे घेण्यासाठी सोलापुरातील जुना पुणे नाका परिसरात सहायक पोलीस निरीक्षक रोहन खंडागळे गेले होते . तक्रारदाराने लाचलुचपत विभागाकडे तक्रार दिल्याने आधीच याठिकाणी सापळा रचण्यात आला होता. सहायक पोलीस निरीक्षक (API) रोहन खंडागळे पैसे स्वीकारण्यासाठी आल्यानंतर लाचलुचपत विभागाने त्यानां रंगेहाथ पकडले.

यावेळी त्यांची चौकशी केली असता हे पैसे पोलीस निरीक्षक संपत पवार यांच्या सांगण्यावरून त्यांच्यासाठी स्वीकारत असल्याची कबुली त्यांनी दिली. त्यावरून(ACB) लाचलुचपत विभागाने पोलीस निरीक्षक संपत पवार आणि सहायक पोलीस निरीक्षक (API)रोहन खंडागळे या दोघांनाही ताब्यात घेतलं आहे. तसेच या दोघांच्या विरोधात फौजदार चावडी पोलीस स्थानाकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक संपत पवार आणि सहायक पोलिस निरीक्षक रोहन खंडागळे यांच्याविरोधात कारवाई होताच (ACB)लाचलुचपत प्रतिबंधक विभागातर्फे दोघांच्या ही घरी जाऊन झडती घेण्यात आली. रात्री झडती घेण्याचे काम सुरूच होते . लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपधीक्षक संजीव पाटील, पोलीस निरीक्षक कविता मुसळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवार्ड करण्यात आली.

Recent Posts